​‘हॅपी भाग जाएगी’चा येणार सीक्वल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 17:57 IST2016-08-29T12:27:31+5:302016-08-29T17:57:31+5:30

‘हॅपी भाग जाएगी’ भलेही १०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला नाही. पण प्रेक्षक व समीक्षकांनी मात्र चित्रपटास सकारात्मक प्रतिसाद दिला. ...

'Happy part will go' sequel? | ​‘हॅपी भाग जाएगी’चा येणार सीक्वल?

​‘हॅपी भाग जाएगी’चा येणार सीक्वल?

ॅपी भाग जाएगी’ भलेही १०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला नाही. पण प्रेक्षक व समीक्षकांनी मात्र चित्रपटास सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रेक्षकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे  ‘हॅपी भाग जाएगी’चे निर्माते आनंद एल रॉय आणि कृषिका लुल्ला उत्साहात आहेत. इतके की, ‘हॅपी भाग जाएगी’चा सीक्वल आणण्याचा विचार त्यांनी चालवला आहे. खळखळून हसवणाºया या चित्रपटातील अभय देओल, डायना पेंटी, मोमल शेख, अली फजल, जिमी शेरगील, पियुष मिश्रा या सर्वांचे काम प्रेक्षकांना आवडले. चित्रपटाचे संगीतही लोकांनी डोक्यावर घेतले. चित्रपटाचे दिग्दर्शक मुद्दसर अजीज व निर्मात सगळी टीम यामुळे आनंदीत आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याचा त्यांचा विचार आहे. सूत्रांच्या मते, मुदस्सर अजीज यांच्याकडे सीक्वलसाठी आणखीही चांगल्या कल्पना आहेत. तेव्हा बघूयात ‘हॅपी भाग जाएगी’ चा सीक्वल किती हसवतो ते?

Web Title: 'Happy part will go' sequel?