Happy Marriage Anniversary : दहा वर्षांनी लहान तरुणासोबत ‘या’ अभिनेत्रीने केले होते सीक्रेट लग्न; आता केला फोटो शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 02:09 PM2018-03-03T14:09:27+5:302018-03-03T19:59:46+5:30

दहा वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत सीक्रेट लग्न करून अभिनेत्री उर्मिला मातोडकरने खळबळ उडवून दिली होती. आता तिने त्याच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे.

Happy Marriage Anniversary: ​​Ten years later, this actress had done a secret marriage with a young man; Share photos done now! | Happy Marriage Anniversary : दहा वर्षांनी लहान तरुणासोबत ‘या’ अभिनेत्रीने केले होते सीक्रेट लग्न; आता केला फोटो शेअर!

Happy Marriage Anniversary : दहा वर्षांनी लहान तरुणासोबत ‘या’ अभिनेत्रीने केले होते सीक्रेट लग्न; आता केला फोटो शेअर!

googlenewsNext
ानकच लग्नाचे फोटो शेअर करून ‘रंगीला’ अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने लाखो चाहत्यांची मने तोडली होती. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या उर्मिलाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मनाला भिडणारा एक फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या चाहत्यांकडून त्यास प्रचंड पसंत केले जात आहे. उर्मिलाच्या लग्नाला आज दोन वर्ष पूर्ण झालीत. त्याचनिमित्त तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत बघावयास मिळत आहे. यावेळी उर्मिलाने त्या फोटोला एक सुंदर असे कॅप्शनही दिले. 

उर्मिलाने लिहिले की, ‘काही असे क्षण असतात जे तुमच्या आयुष्यात खूपच महत्त्वपूर्ण असतात. तुम्हा सर्वांसोबत असाच एक अविस्मरणीय क्षण मी शेअर करीत आहे. तुम्हा सर्वांच्या पाठबळासाठी मी ऋणी आहे. नेहमीच असेच पाळबळ आणि सहकार्य असू द्या’ काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने तिच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले होते. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. या फोटोमध्ये उर्मिला केक कापताना आणि मेणबत्ती विझविताना बघावयास मिळत होती. या सर्वच फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. 
 

तुमच्या माहितीसाठी, उर्मिलाने मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत २०१६ मध्ये लग्न केले होते. मोहसीन काश्मिरी बिजनेसमॅन असून, एक मॉडल आहे. उर्मिलाने अतिशय सीक्रेट पद्धतीने मोहसीनसोबत लग्न केले होते. मोहसीन उर्मिलापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. उर्मिलाने तिच्या लग्नाचा अचानकच उलगडा केला होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांना जबरदस्त हादरा बसला होता. मोहसीन उर्मिलापेक्षा दहा वर्षांनी लहान असल्याने हे लग्न चांगलेच चर्चेत आले होते. 

Web Title: Happy Marriage Anniversary: ​​Ten years later, this actress had done a secret marriage with a young man; Share photos done now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.