हिरवी साडी, टिकली मधला 'नवाज' बघितला का, हड्डी सिनेमाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:52 PM2022-11-17T17:52:15+5:302022-11-17T17:55:09+5:30

नेहमीच मोठ्या पडद्यावर विविधांगी भुमिका करणारा, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणारा बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आता पुन्हा चाहत्यांना सरप्राईझ करणार आहे.

Green saree, ticked | हिरवी साडी, टिकली मधला 'नवाज' बघितला का, हड्डी सिनेमाची उत्सुकता

हिरवी साडी, टिकली मधला 'नवाज' बघितला का, हड्डी सिनेमाची उत्सुकता

googlenewsNext

नेहमीच मोठ्या पडद्यावर विविधांगी भुमिका करणारा, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणारा बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आता पुन्हा चाहत्यांना सरप्राईझ करणार आहे. आगामी हड्डी या चित्रपटातुन तो चाहत्यांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील त्याची भुमिका आणि लुक पाहून सगळेच अचंबित झाले आहेत.

आगामी हड्डी या चित्रपटातील लुकमध्ये नवाजुद्दीन कोण असा प्रश्न पडेल. कारण यात नवाजुद्दिन ट्रांसजेंडरची भुमिका साकारत आहे. विशेष म्हणजे यामध्ये त्याने खरोखरच्या ट्रांसजेंडरसोबत काम केले आहे. एकंदर या चित्रपटाच्या अनुभवाविषयी नवाज सांगतो, 'हड्डी या सिनेमात ८० खऱ्या ट्रांसजेंडरसोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करणे माझ्यासाठी सन्मानाची आणि सौभाग्याची बाब आहे. हा अनुभव अप्रतिम होता. या समुदायाविषयी मला अधिक माहिती मिळाली, त्यांचे आयुष्य जवळून बघता आले आणि या सिनेमाच्या माध्यमातून जगता आले.

साडीमध्ये नवाज 

यापुर्वी सिनेमातील नवाजचा लुक शेअर करण्यात आला होता. तर नुकताच नवाजचा हिरव्या साडीतील लुक शेअर करण्यात आला आहे. लाल रंगाची टिकली आहे, डार्क शेड लिपस्टीक आणि खुल्या केसातला नवाज ओळखणेही कठीण आहे. 

हड्डी हा सिनेमा अक्षत अजय शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. तर हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. हड्डी मधुन नवाज बॉक्सऑफिसवर काय धमाका करतो हे बघता येईल.

Web Title: Green saree, ticked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.