दादाजी, अब बस करो...! प्रिया प्रकाश वारियरवर भाळलेल्या ऋषी कपूर यांना लोकांनी दिला सल्ला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 15:37 IST2018-02-18T10:07:04+5:302018-02-18T15:37:04+5:30

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सध्या कुणावर लट्टू आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच. होय, जिने सगळ्या सोशल मीडियाला वेड लावलेयं, ...

Grandpa, now just do it ...! People advised Rishi Kapoor to get rid of Priya Prakash Warrier !! | दादाजी, अब बस करो...! प्रिया प्रकाश वारियरवर भाळलेल्या ऋषी कपूर यांना लोकांनी दिला सल्ला!!

दादाजी, अब बस करो...! प्रिया प्रकाश वारियरवर भाळलेल्या ऋषी कपूर यांना लोकांनी दिला सल्ला!!

येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सध्या कुणावर लट्टू आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच. होय, जिने सगळ्या सोशल मीडियाला वेड लावलेयं, तिनेच ऋषी कपूर यांनाही वेड लावलेय. ती कोण तर अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर. प्रियाच्या खट्याळ अदांनी ऋषी कपूर यांनाही घायाळ केले. यानंतरच्या आपल्या भावना त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. ‘माझ्या वेळेस कुठे होतीस?’ असा तेवढाच खट्याळ प्रश्न त्यांनी सोशल मीडियावर विचारून टाकला होता. ‘या मुलीला प्रचंड स्टारडम मिळेल. प्रिया ही व्यक्त होणारी निरागस तेवढीच सुंदर मुलगी आहे. तुझ्या वयोगटातील मुलींसाठी तू शर्यत भलतीच कठीण करून ठेवली आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा, माझ्यावेळेस का आली नाहीस? कुठे होतीस?,’ असे ट्विट ऋषी यांनी केले होते. पण या ट्विटनंतर ऋषी कपूर यांची सोशल मीडियावर चांगलीच मजा घेतली जात आहे. अनेक युजर्सनी तर हे ट्विट वाचून ऋषी यांच्याबद्दल अपमानास्पद प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. एका युजरने त्याना ‘बुढाऊ’ म्हटले आहे तर एकाने ‘दादाजी’.  ‘दादाजी, अब बस करो, बेटा जवान हो गया है’ असा सल्लाही अनेकांनी दिला आहे.




ALSO READ : चिंटू अंकल ऋषी कपूर प्रिया वारियरवर झाले फिदा; म्हटले, ‘आशिक बनाया आपने’!

तसे पाहता, ट्रोल होणे ऋषी कपूर यांच्यासाठी नवी गोष्ट नाही. अनेकदा आपल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे ऋषी कपूर सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. पण प्रियाच्या या ट्विटवर आपण ट्रोल होऊ, असे ऋषी यांना स्वत:लाही वाटले नसेल. प्रिया प्रकाश हिने तर स्वप्नातही तसा विचार केला नसेल.
व्हॅलेन्टाई वीकमध्ये प्रिया प्रकाश वारियरची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ‘ओरू आधार लव’ या मल्याळम चित्रपटातील एका गाण्यातील काही सेकंदाच्या या क्लीपने सोशल मीडियावर आग लावली होती.  ‘ओरू आधार लव’ या चित्रपटाद्वारे प्रिया अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय. पण त्याआधीच ती इंटरनेट सेन्सेशन झाली आहे.
 

Web Title: Grandpa, now just do it ...! People advised Rishi Kapoor to get rid of Priya Prakash Warrier !!