लहानग्या चाहतीला सुशांतने हाताने भरवले होते जेवण, व्हिडीओ पाहून चाहते झाले Emotional

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:15 PM2020-06-15T16:15:34+5:302020-06-15T16:19:28+5:30

छोट्या शहरातून इंजिनिअरींग करून मग डान्स शो, टीव्ही सिरिअल आणि बॉलिवूड असा सुशांतचा प्रवास होता.

A Gem of a person! Here’s a video of Sushant Singh Rajput Bonding with a little fan | लहानग्या चाहतीला सुशांतने हाताने भरवले होते जेवण, व्हिडीओ पाहून चाहते झाले Emotional

लहानग्या चाहतीला सुशांतने हाताने भरवले होते जेवण, व्हिडीओ पाहून चाहते झाले Emotional

googlenewsNext

वांद्र्यातील त्याच्या फ्लॅटमधून पोलिसांनी सुशांत याचा फास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह जप्त केला. त्याने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. 9 जून रोजी सुशांत याची माजी मॅनेजर सलियन हिनेही इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. तेव्हा सुशांतने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती की, ही अत्यंत दुखद बातमी आहे...सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून सारेच सुन्न झाले आहे. अनेक प्रश्नांनी आज काहुर माजला आहे. सोशल मीडियावर त्याचे वेगवेगळे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहे.


अशात एक व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका  चिमुकलीला स्वतःच्या हाताने भरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही लहानगी त्याची चाहती आहे. या लहानगीचे त्याच्याविषयी असलेले प्रेम पाहून सुशांतही भारवला असणार. आणि काही वेळ त्याने तिच्याबरोबर अशापद्धतीने घालवला. त्या दिवशी सारे दुःख विसरून मनमोकळेपणाने त्या क्षणाचा आनंद सुशांतने नक्कीच घेतला असणार. 


स्वत:च्या हिमतीच्या जोरावर सुशांतनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं, मात्र आता पुन्हा एकदा बॉलिवूड आणि नैराश्य या विषयावर बोललं जात आहे. छोट्या शहरातून इंजिनिअरींग करून मग डान्स शो, टीव्ही सिरिअल आणि बॉलिवूड असा सुशांतचा प्रवास होता. तो एक प्रतिभावंत कलाकार होता, त्यामुळं त्याच्यावर टीका कमी आणि त्याचं कौतुक जास्त व्हायचं. मात्र तरी काही गोष्टी त्याच्या नैराश्याचं कारण ठरली. सुशांत आपल्या इन्स्टापोस्टमधून कायम आपली खदखद बोलून दाखवत होता. मात्र तो असं काही करेल, असं कधीच कोणाला वाटलं नाही.
 

Web Title: A Gem of a person! Here’s a video of Sushant Singh Rajput Bonding with a little fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.