शाहरुख खानचा 'डंकी' पहिल्यानंतर काय होती गौरी खानची प्रतिक्रिया ?, किंग खानने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 11:05 IST2023-12-21T11:02:31+5:302023-12-21T11:05:20+5:30

शाहरुख खानने खुलासा केला हा डंकी पाहिल्यानंतर गौरी खानची पहिली प्रतिक्रिया.

Dunki shah rukh khan reveals gauri khan and abram reaction after watching his film | शाहरुख खानचा 'डंकी' पहिल्यानंतर काय होती गौरी खानची प्रतिक्रिया ?, किंग खानने केला खुलासा

शाहरुख खानचा 'डंकी' पहिल्यानंतर काय होती गौरी खानची प्रतिक्रिया ?, किंग खानने केला खुलासा

शाहरुख खानचा मोस्ट अवेडेट 'डंकी' थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमा रिलीजच्या आधी किंगखान दुबईतून परताना त्याने Asksrk सेशल घेतलं.  यात त्याने सिनेमाचं प्रमोशन केलं.    
  
शाहरुख खानचा डंकी पहिल्यानंतर काय होती गौरीची प्रतिक्रिया 
शाहरुख खानने खुलासा केला हा डंकी पाहिल्यानंतर गौरी खान आणि अबराम खानची प्रतिक्रिया काय होती. एका चाहत्याने शाहरुखला विचारलं गौरीला सिनेमा कसा वाटला, यावर तो म्हणाला, तिला 'डंकी' फार आवडलं आणि हा सिनेमा अभिमान वाटावा असा आहे.       

शाहरुख खानच्या 'पठान'चा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने आपल्या एक्स हँडलवर लिहिले, कधी कधी असे सिनेमे येतेत ज्यात तगडे कलाकार एकत्र असतात. जे आपल्या प्रतिभेने यशाचं शिखर गाठतात. शाहरुख खान  आणि राज कुमार हिरानी सर मी याची आतुरतेने वाट पाहतो आहे. 

शाहरुखबरोबर या सिनेमात तापसी पन्नू,विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'डंकी' मध्ये शाहरुखने हार्डी ही भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगलाही एका आठड्यापूर्वीच सुरुवात झाली होती. ॲडव्हान्स बुकिंगमधून शाहरुखच्या 'डंकी'ने कोटींची कमाई केली आहे. 

शाहरुखचा 'डंकी' गुरुवारी (२१ डिसेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तर 'सालार' शुक्रवारी (२२ डिसेंबर) चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. केवळ २४ तासांच्या अंतराने भारतीय सिनेसृष्टीतील शाहरुख खान आणि प्रभास हे दोन बडे स्टार्स आमनेसामने उभे ठाकणार आहेत. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
 

Web Title: Dunki shah rukh khan reveals gauri khan and abram reaction after watching his film