​न्यायालयाच्या फे-यातून सुटका नाहीचं! पुन्हा तुरुंगात जाता जाता वाचला सलमान खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:02 IST2018-04-12T07:32:41+5:302018-04-12T13:02:41+5:30

सुमारे २० वर्षांपूर्वीचे काळवीट शिकार प्रकरण सलमान खानला भारी पडतेय. गत ५ तारखेला याप्रकरणी जोधपूरच्या एका न्यायालयाने सलमानला पाच ...

Do not get rid of the court's verdict! Salman Khan goes to jail again! | ​न्यायालयाच्या फे-यातून सुटका नाहीचं! पुन्हा तुरुंगात जाता जाता वाचला सलमान खान!!

​न्यायालयाच्या फे-यातून सुटका नाहीचं! पुन्हा तुरुंगात जाता जाता वाचला सलमान खान!!

मारे २० वर्षांपूर्वीचे काळवीट शिकार प्रकरण सलमान खानला भारी पडतेय. गत ५ तारखेला याप्रकरणी जोधपूरच्या एका न्यायालयाने सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. यानंतर जामीन मिळेपर्यंतच्या दोन रात्री सलमानला तुुरूंगात घालवाव्या लागल्यात. जामीन मिळाल्यानंतर सलमान सुटला खरा पण मंगळवारी पुन्हा एकदा तो तुरुंगात जाता जाता वाचला.  होय, २००२ च्या हिट अ‍ॅण्ड रन केसप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयाने सलमान विरोधात जामीन वॉरंट जारी केला. सलमान न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्याला हा वॉरंट बजावण्यात आला होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या वकीलाने गत फेबु्रवारीत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत, हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातील जमानतदार बदलण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने ही परवानगीही दिली होती. यानंतर सलमानचा बॉडीगार्ड शेरा याला याप्रकरणी जमानतदार बनवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करत, सत्र न्यायालयाने सलमानला नोटीस पाठवले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पोलिसांनी सलमानच्या घरी नोटीस पाठवले होते. पण सलमान दुबईत असल्याने पोलिसांनी त्याचे वडील सलीम खान यांना हे नोटीस दिले होते. या नोटीसनंतर सलमान वा त्याचा वकील न्यायालयात हजर झाले नाहीेत. यानंतर न्यायालयाने दुसरे नोटीस जारी केले. मात्र सलमान वा त्याचा वकील यावेळी न्यायालयात गैरहजर राहिले. यानंतर गत मंगळवारी न्यायालयाने सलमानविरोधात जामीन वॉरंट जारी केला. अर्थात सलमानच्या वकीलाने लगेच या जामिन वॉरंटवर स्थगिती मिळवली.
तूर्तास सलमान ‘रेस3’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.  तुरुंगातून बाहेर येताच सलमान या चित्रपटाच्या शूटींगमध्ये गुंतला.

ALSO READ : सलमान खानच्या समर्थनार्थ अशी काय बोलली ‘ही’ अभिनेत्री की मिळू लागल्या धमक्या?

Web Title: Do not get rid of the court's verdict! Salman Khan goes to jail again!