"सध्या चित्रपटांत पुरुषांची दाढी वाढलेली असते आणि ते सिगरेट पितात..."; करण जोहरची टीका, व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:18 IST2026-04-26T16:16:11+5:302026-04-26T16:18:04+5:30

करणच्या मते, पडद्यावर अशा प्रकारची पात्रे दाखवणे आणि त्यांचे उदात्तीकरण करणे हे समाजासाठी धोक्याचे ठरू शकते.

diretor Karan Johar criticizes current bollywood movies alpha male portrait | "सध्या चित्रपटांत पुरुषांची दाढी वाढलेली असते आणि ते सिगरेट पितात..."; करण जोहरची टीका, व्यक्त केली नाराजी

"सध्या चित्रपटांत पुरुषांची दाढी वाढलेली असते आणि ते सिगरेट पितात..."; करण जोहरची टीका, व्यक्त केली नाराजी

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. अलीकडेच त्याने चित्रपटांमधील पुरुषांच्या पात्रांमधील वाढत्या 'अल्फा' (Alpha) आणि 'टॉक्सिक' (Toxic) स्वभावावर कडाडून टीका केली आहे. करणच्या मते, पडद्यावर अशा प्रकारची पात्रे दाखवणे आणि त्यांचे उदात्तीकरण करणे हे समाजासाठी धोक्याचे ठरू शकते.

'अल्फा टॉक्सिसिटी'वर टीका

एका कार्यक्रमात बोलताना करण जोहर म्हणाला की, सध्या चित्रपटसृष्टीत अशा पात्रांचा ट्रेंड सुरू आहे जे प्रचंड रागीट, इतरांवर वर्चस्व गाजवणारे आणि हिंसक असतात. अशा पात्रांना 'अल्फा मेल' म्हणून सादर केले जाते आणि दुर्दैवाने युवा पिढी चित्रपटातील या पात्रांची खऱ्या आयुष्यात नक्कल करते. करण म्हणाला, "प्रत्येकजण या टॉक्सिसिटीची कॉपी करत आहे आणि तिलाच खरा पुरुषार्थ समजत आहे, जे अत्यंत चुकीचे आहे."

या चर्चेदरम्यान करण जोहरने स्वतःबद्दल एक विधान केले. तो म्हणाला, "मी स्वतःला जन्मापासून स्त्रीवादी मानतो. माझ्या चित्रपटांमध्ये मी नेहमीच महिलांना सशक्त आणि त्यांचे स्वतःचे विचार मांडणाऱ्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण सध्या चित्रपटांत पुरुषांची दाढी वाढलेली असते. त्यांना सिगारेट पिताना दाखवलं जातं. महिलांना हेच बघायला आवडतं, असं त्यांना वाटतं."

करणने पुढे स्पष्ट केले की, चित्रपट हे समाजाचा आरसा असतात आणि दिग्दर्शकांनी आपली जबाबदारी ओळखायला हवी. केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्यासाठी हिंसक किंवा महिलांचा अनादर करणारी पात्रे पडद्यावर रंगवणे चुकीचे आहे. त्याने चित्रपट निर्मात्यांना आवाहन केले की, त्यांनी अधिक संवेदनशील आणि जबाबदार व्यक्तिरेखा निर्माण करण्यावर भर द्यावा.

Web Title: diretor Karan Johar criticizes current bollywood movies alpha male portrait