दिलजीत करतोय ‘पैसा पैसा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 10:58 IST2016-06-22T05:28:49+5:302016-06-22T10:58:49+5:30

पैसा कोणाला नकोय? अहो, असं आम्ही नाही तर दिलजीत दोसांज म्हणतोय. ‘उडता पंजाबा’मधून प्रसिद्ध झालेल्या दिलजीत समोर आता चित्रपटांची ...

Diljeet ki 'money money' | दिलजीत करतोय ‘पैसा पैसा’

दिलजीत करतोय ‘पैसा पैसा’

सा कोणाला नकोय? अहो, असं आम्ही नाही तर दिलजीत दोसांज म्हणतोय.

‘उडता पंजाबा’मधून प्रसिद्ध झालेल्या दिलजीत समोर आता चित्रपटांची रीघ लागलेली आहे. परंतु हा पठ्या इतक्या सहजासहजी फिल्म स्वीकारण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीए.

मिलन लुथ्रियांचा महत्त्वकांक्षी चित्रपट ‘बादशाहो’मध्ये अजय देवगणसोबत काम करण्याचा प्रस्ताव घेऊन ते दिलजीतकडे गेले असता त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

कारण?

कारण आहे दिलजीत मागत असलेले पैसे. त्याने निर्मात्यांसमोर रोलसाठी जी किंमत मागितली ती काही त्यांना पसंत पडली नाही. त्यामुळे आता त्याच्याऐवजी इम्रान हाश्मीला कास्ट करण्यात आले आहे.

याबाबत खुद्द दिलजीतनेच सांगितले की, मी आतापर्यंत जे काम केलं आहे, त्यातून विशेष अशी काही कमाई करू शकलेलो नाही. आणि पैसा कोणाला नकोय? त्यामुळे पैसा कमवण्याची हीच खरी वेळ आहे. आणि तसेही मला स्वत:ला लीड अ‍ॅक्टरम्हणून प्रस्थापित करायचे आहे. साईडरोल माझी प्रिआॅरिटी नाही.

Web Title: Diljeet ki 'money money'