‘ देसी गर्ल ’ परतली मायदेशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 10:26 IST2016-05-28T04:56:35+5:302016-05-28T10:26:35+5:30

‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही शो साठी अमेरिकेत गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा ही काल भारतात परतली आहे. केवळ दहा ...

'Desi Girl' returned home! | ‘ देसी गर्ल ’ परतली मायदेशी!

‘ देसी गर्ल ’ परतली मायदेशी!

्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही शो साठी अमेरिकेत गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा ही काल भारतात परतली आहे. केवळ दहा दिवसांसाठी ती मायदेशी परतली असल्याचे कळाले आहे. ती बेवॉच ची शूटिंग तिथे करत होती.

पण, तिने भारतातील चित्रपट, जाहीराती, मिटींग्ज यांच्याबद्दलच्या काही कमिटमेंट्स घेतलेल्या होत्या. त्यांना पूर्ण करण्यासाठी ती भारतात परतली आहे. भारतात आल्यावर तिचे शो चे काम खोळंबू नये म्हणून तिने येण्याअगोदर जवळपास २४ तास काम करून आलेली आहे.

ती मुंबई एअरपोर्टवर आल्यानंतर तिच्या फॅन्सनी लाल फुगे तिच्यासाठी हवेत उडवून आपले प्रेम व्यक्त केले. माध्यमांशी बोलतांना ती म्हणाली,‘ मी ‘बेवॉच’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे.

‘क्वांटिको’ ची शूटिंग जुलैमध्ये सुरू होणार आहे. मी दहा दिवसांसाठी घरी आली आहे. हिंदीत मी आता कोणते चित्रपट करणार हे मी ठरवेन. लवकरच एखाद्या मोठ्या हिंदी चित्रपटाची घोषणा मी करेन.’ 

Web Title: 'Desi Girl' returned home!