दीपिकाच्या या निर्णयावर नाराज होते तिचे आई-बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:24 IST2017-11-03T05:08:57+5:302018-04-03T14:24:58+5:30

बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री मधील एक दीपिकाचे नाव सगळ्यात जास्त मानधन घेण्याऱ्या अभिनेत्रीच्या यादीत आहे. ती आज एक यशस्वी ...

Deepika's decision was angered by her parents | दीपिकाच्या या निर्णयावर नाराज होते तिचे आई-बाबा

दीपिकाच्या या निर्णयावर नाराज होते तिचे आई-बाबा

लिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री मधील एक दीपिकाचे नाव सगळ्यात जास्त मानधन घेण्याऱ्या अभिनेत्रीच्या यादीत आहे. ती आज एक यशस्वी अभिनेत्री आहे  पण तिचा इथपर्यंतचा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता तिच्या आयुष्यात भरपूर चाढ-उतार आले. तुम्हाला माहीत आहे का दीपिकाच्या आई-वडिलांची अजिबात इच्छा नव्हती की चित्रपटात काम करावे चला तुम्हला आज सविस्तर सांगतो. 

दीपिका नुकतीच बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीच्या पुस्तक प्रकाशनच्या वेळेस दिसण्यात आली. हेमा मालिनी च्या आयुष्यावर लेखक राम कमल मूखर्जी ह्यांनी 'बेयोन्ड द ड्रीम गर्ल' हे पुस्तक लिहिले ह्याच पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस दीपिका उपस्थित होती.
 
पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस दीपिकाने  काही जुन्या आठवणी शेअर केल्या तेव्हा ती म्हणाली की मी लहान असतानाच काम करायला सुरुवात केली होती, मी १२ वी नंतर पुढे शिकले नाही ह्यावर माझे आई व वडील खुश नव्हते त्यांनी मला माझ्या सुरवातीला काही सपोर्ट पण नाही केला त्यांची इच्छा होती की मी माझे आधी शिक्षण पूर्ण करू आणि मग काय ते करियर करू करण त्यांचे असे म्हणणे होते की मी माझे शिक्षण थांबवू नये कारण ह्या प्रोफेशन मध्ये काही सांगता येत नाही की तुम्ही कितपत यशस्वी व्हाल, दीपिका हे ही म्हणाली जसे मध्यमवर्गीय आई वडील आपल्या मुलांसाठी विचार करतात तसाच विचार माझ्या आई वडिलांनी सुद्धा केला पण नंतर माझ्या मेहनतीकडे बघून माझ्या आई वडिलांनी त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी मला सपोर्ट केला. तरीही आज ही दीपिकाला तिचे शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत आहे.

सध्या दीपिका तिच्या आगामी चित्रपट पद्मावती ला घेऊन फार चर्चेत आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी बरोणर ती हा तिसरा चित्रपट करत आहे ह्या आधी ती संजय लीला भन्साळी बरोबर 'गोलियों की रासलीला रामलीला' आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट केले आहेत.

Web Title: Deepika's decision was angered by her parents