दीपिका करते स्वत:ची कामे स्वत:च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 09:48 IST2016-07-02T04:18:04+5:302016-07-02T09:48:04+5:30

 दीपिका पदुकोन ही तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ मध्ये दिसणार आहे. ती तिच्या ...

Deepika does self-work herself! | दीपिका करते स्वत:ची कामे स्वत:च!

दीपिका करते स्वत:ची कामे स्वत:च!

 
ीपिका पदुकोन ही तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ मध्ये दिसणार आहे. ती तिच्या या शूटींगबद्दलच्या घडामोडी सांगताना म्हणते,‘ खरंतर एक गोष्ट महत्त्वाची अशी की, मी कुठेही गेले तरी माझे कपडे मीच धूवत असते. आणि मी त्याबाबतीत खुप गंभीर आहे.

मला माझी कामे स्वत: करता आली तर मी खुपच खुश होते. मी स्वत: मला लागणारे सामान खरेदी करावयास जात असे. जेवण बनवणे आणि कपडे धुवणे ही कामे मी स्वत: करायची.’

पुढे ती म्हणते,‘ याअगोदरही मला हॉलीवूडमधून अनेक संधी आल्या होत्या. पण, तेव्हा मी तयार नव्हते. प्रश्न भूमिका किती आहे याबद्दल नाही तर प्रत्येक भूमिका ही महत्त्वाची असते. कलाकार त्याला कसा सजवतो यावर आधारीत असते.’ 

Web Title: Deepika does self-work herself!