मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भावला उत्तर प्रदेशात चित्रपट ‘करमुक्त’ घोषित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:44 IST2026-05-12T11:43:44+5:302026-05-12T11:44:47+5:30

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण राज्यात तो करमुक्त केला आहे.

Cm Yogi Adityanath Declares Krishnavataram Tax-free In Uttar Pradesh | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भावला उत्तर प्रदेशात चित्रपट ‘करमुक्त’ घोषित!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भावला उत्तर प्रदेशात चित्रपट ‘करमुक्त’ घोषित!

अभिनेता सिद्धार्थ गुप्ता आणि सुष्मिता भट यांची मुख्य भूमिका असलेला 'कृष्णावतारम' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशात आता आणखी एक मोठी भर पडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण राज्यात तो 'करमुक्त' (Tax-Free) करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे चित्रपटाचे निर्माते आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लखनौमध्ये या चित्रपटासाठी एका विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, कॅबिनेट मंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी आणि अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाच्या विषयाचे आणि सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

'कृष्णावतारम'ची कथा जगन्नाथ पुरी येथून सुरू होते. मंदिरातील भक्तांना एक गुरू भगवान कृष्णाच्या जीवनातील विविध पैलू आणि कथा सांगत असताना हा चित्रपट प्रेक्षकांना पौराणिक काळात घेऊन जातो. श्रीकृष्णाचे जीवन, त्यांचे विचार आणि मानवी कल्याणासाठी त्यांनी दिलेला संदेश अतिशय प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यात आला आहे. सिद्धार्थ गुप्ताने साकारलेली कृष्णाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

करमुक्त झाल्यामुळे कमाईत वाढ होणार
उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात चित्रपट करमुक्त झाल्यामुळे तिकिटांचे दर कमी होतील, परिणामी जास्तीत जास्त प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातील. यामुळे 'कृष्णावतारम'च्या एकूण कमाईला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title : योगी आदित्यनाथ ने 'कृष्णावतारम' को उत्तर प्रदेश में कर-मुक्त घोषित किया

Web Summary : उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने लखनऊ में एक विशेष स्क्रीनिंग के बाद 'कृष्णावतारम' को कर-मुक्त घोषित किया। सिद्धार्थ गुप्ता अभिनीत इस फिल्म ने राज्यपाल और उपमुख्यमंत्री सहित अधिकारियों को प्रभावित किया। कर छूट से भगवान कृष्ण के जीवन को दर्शाती फिल्म को दर्शकों और राजस्व में वृद्धि होने की उम्मीद है।

Web Title : Yogi Adityanath Declares 'Krishnavataram' Tax-Free in Uttar Pradesh After Viewing Film

Web Summary : Uttar Pradesh CM Yogi Adityanath declared 'Krishnavataram' tax-free after a special screening in Lucknow. The film, starring Siddharth Gupta, impressed officials including the Governor and Deputy CM. The tax exemption is expected to boost viewership and revenue for the movie depicting Lord Krishna's life.