Brahmastra 2 Update: 'ब्रम्हास्त्र २'ची वाट बघताय? निर्मात्यांनी शूटिंगविषयी दिली महत्वाची माहिती, चाहत्यांना आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:30 IST2026-04-15T13:59:39+5:302026-04-15T14:30:16+5:30

Brahmastra 2 Movie Update: दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने २०२२ मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'ब्रह्मास्त्र २'ची आतुरतेने वाट पाहत आहेत

Bramhastra 2 update producer namit malhitra give big information about movie | Brahmastra 2 Update: 'ब्रम्हास्त्र २'ची वाट बघताय? निर्मात्यांनी शूटिंगविषयी दिली महत्वाची माहिती, चाहत्यांना आनंद

Brahmastra 2 Update: 'ब्रम्हास्त्र २'ची वाट बघताय? निर्मात्यांनी शूटिंगविषयी दिली महत्वाची माहिती, चाहत्यांना आनंद

दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने २०२२ मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'ब्रह्मास्त्र २' (Brahmastra 2) ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटाबाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच 'ब्रह्मास्त्र २'च्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले नमित मल्होत्रा?

नमित मल्होत्रा यांनी एका मुलाखतीत संकेत दिले आहेत की 'ब्रह्मास्त्र २'चं शूटिंग लवकरच सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आणि भव्य असेल. आम्ही प्रेक्षकांसाठी काहीतरी विशेष आणि जागतिक दर्जाचे तयार करत आहोत. पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद पाहून आमची जबाबदारी वाढली आहे," असे त्यांनी नमूद केले. 

सध्या नमित मल्होत्रा त्यांच्या महत्वाकांक्षी 'रामायण' प्रोजेक्टच्या तयारीत गुंतले आहेत. या चित्रपटाचे एक भाग यावर्षीच्या दिवाळीत तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे. त्यामुळे 'रामायण'चं काम झाल्यावर नमित मल्होत्रा 'ब्रह्मास्त्र २'च्या शूटिंगला सुरुवात करतील.

रणबीर-आलियाची जोडी पुन्हा दिसणार

चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही रणबीर कपूर (शिवा) आणि आलिया भट्ट (ईशा) यांच्या मुख्य भूमिका असतील. मात्र, दुसऱ्या भागात 'देव' या पात्राची कथा अधिक विस्तारली जाण्याची शक्यता आहे. 'देव'ची भूमिका कोण साकारणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, पण चाहत्यांमध्ये रणवीर सिंग किंवा हृतिक रोशन यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. नमित मल्होत्रा यांच्या या अपडेटमुळे 'ब्रह्मास्त्र २' सिनेमा २०२८ पर्यंत प्रदर्शित होईल, अशी शक्यता आहे.

Web Title : ब्रह्मास्त्र 2: शूटिंग अपडेट से सीक्वल का इंतजार कर रहे प्रशंसक उत्साहित।

Web Summary : ब्रह्मास्त्र 2 की शूटिंग जल्द शुरू हो सकती है। निर्माता नमित मल्होत्रा का कहना है कि फिल्म तकनीकी रूप से उन्नत होगी। रणबीर कपूर और आलिया भट्ट वापसी करेंगे, 'देव' चरित्र को आगे बढ़ाया जाएगा। फिल्म 2028 तक रिलीज होने की उम्मीद है।

Web Title : Brahmastra 2: Shooting update excites fans awaiting the sequel.

Web Summary : Brahmastra 2 shooting may start soon. Producer Namit Malhotra says the film will be technically advanced. Ranbir Kapoor and Alia Bhatt will return, with 'Dev' character explored further. The film is expected to release by 2028.