"अक्षय खन्ना हवा होता...", 'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' गाणं पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:54 IST2026-01-03T12:53:53+5:302026-01-03T12:54:19+5:30
'बॉर्डर' सिनेमातील सगळीच गाणी हिट ठरली होती. या सिनेमातील 'संदेसे आते है' गाणं आजही लोकप्रिय आहे. 'बॉर्डर २'मध्येही 'संदेसे आते है' गाण्याचा रिमेक पाहायला मिळणार आहे. 'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

"अक्षय खन्ना हवा होता...", 'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' गाणं पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले...
ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत तो 'बॉर्डर २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. 'बॉर्डर' सिनेमातील सगळीच गाणी हिट ठरली होती. या सिनेमातील 'संदेसे आते है' गाणं आजही लोकप्रिय आहे. 'बॉर्डर २'मध्येही 'संदेसे आते है' गाण्याचा रिमेक पाहायला मिळणार आहे. 'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'घर कब आओगे' गाण्याचा लाँच सोहळा उदयपूरमध्ये पार पडला. प्रदर्शित होताच या गाण्याने चाहत्यांची मनं जिंकली आहे. संदेसे आते है प्रमाणेच 'घर कब आओगे' या गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्याने प्रदर्शित होताच १३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या संदेसे आते है गाण्याचं नवं व्हर्जन 'घर कब आओगे' हे गाणं मनोज मुंतशिर यांनी लिहिलं आहे. या गाण्याला सोनू निगम, अरिजीत सिंह, दिलजीत दोसांझ आणि विशाल मिश्रा यांनी आवाज दिला आहे. हे गाणं ऐकल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो.
'घर कब आओगे' गाण्याची सुरुवात वरुण धवनच्या हातात असलेल्या पत्राने होते. त्यानंतर गाण्यात दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी आणि सनी देओलही दिसतात. 'घर कब आओगे' गाण्यामध्ये आर्मी कॅप्म, एअर फोर्स आणि नौदल हे तिनही दल दिसत आहेत. काहींनी या रिमेकचं कौतुक केलं आहे. तर काहींना हे नवं गाणं पाहून जुन्या संदेसे आते है गाण्याची आठवण झाली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. "जुनं ते सोनं" असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींना अक्षय खन्नाची आठवण आली आहे. "या गाण्यात अक्षय खन्ना हवा होता" अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, 'बॉर्डर २' सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर येत्या २३ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात सनी देओल, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, वरुण धवन, मोना सिंह, सोनम बाजवा, मेधा राणा अशी स्टारकास्ट आहे. अनुराग सिंग यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.