बॉलीवुडची बेस्ट मॉम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 18:28 IST2016-05-16T12:57:55+5:302016-05-16T18:28:59+5:30

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन बॉलीवुडची बेस्ट मॉम का म्हणतात याला कारण तिला मातृत्व ओझं वाटत नसून आईपण ती एन्जॉय करत ...

Bollywood's Best Mom | बॉलीवुडची बेस्ट मॉम

बॉलीवुडची बेस्ट मॉम

िनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन बॉलीवुडची बेस्ट मॉम का म्हणतात याला कारण तिला मातृत्व ओझं वाटत नसून आईपण ती एन्जॉय करत आहे. आराध्याच्या आईपणाची जबाबादारी आनंदानं निभावत असल्याचा खुलासा खुद्द ऐशनं केला आहे. कामावर जाणा-या काही महिला आपल्या लहान मुलांची जबाबदारी आजी किंवा इतर व्यक्तींकडे सोपवून जातात. मात्र ऐशला हे काही मान्य नाही. दुस-यावर लेकीची जबाबदारी दुस-यावर ढकलण्यासाठी आराध्याला जन्म दिला नसल्याचं ऐशनं म्हटलं आहे. शूटवर किंवा सेटवर जाण्याआधी आराध्याची पूर्ण तयारी करते. त्यानंतर तिला शाळेसाठी तयार करते. इतकंच नाही तर सेटवर जाण्याआधी तिला शाळेत ड्रॉप करत असल्याचंही ऐशनं म्हटलं आहे. त्यानुसार सगळं प्लानिंग करत असल्याचा खुलासाही ऐशनं केला आहे. आपल्याला कायम सहकार्य करणा-या कामावरील सहका-यामुळं शक्य झाल्याचंही ऐशनं सांगितलं. मातृत्वाचा आनंद घेत असल्याचंही तिनं स्पष्ट केलंय. 

Web Title: Bollywood's Best Mom