शाहरुखच्या 'मन्नत'वर सलमान, अक्षय अन् सैफ एकत्र पोहोचले; नेमकं कारण काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 02:55 PM2022-04-03T14:55:32+5:302022-04-03T14:58:25+5:30

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान नुकताच 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगवरून भारतात परतला आहे. पण शाहरुख भारतात परतल्यानंतर असं काय झालं की बॉलिवूडचे तीन दिग्गज कलाकार शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्यावर पोहोचले.

bollywood shah rukh khan poses with saudi minister mohammed al turki salman khan saif ali khan and akshay kumar also spotted see photos | शाहरुखच्या 'मन्नत'वर सलमान, अक्षय अन् सैफ एकत्र पोहोचले; नेमकं कारण काय? जाणून घ्या...

शाहरुखच्या 'मन्नत'वर सलमान, अक्षय अन् सैफ एकत्र पोहोचले; नेमकं कारण काय? जाणून घ्या...

googlenewsNext

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान नुकताच 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगवरून भारतात परतला आहे. पण शाहरुख भारतात परतल्यानंतर असं काय झालं की बॉलिवूडचे तीन दिग्गज कलाकार शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्यावर पोहोचले. अभिनेता सलमान खान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार नुकतेच 'किंग खान'च्या घरी पोहोचले. बॉलिवूडचे हे दिग्गज कलाकार शाहरुखच्या बंगल्यावर का पोहोचले यामागचं कारण समोर आलं आहे. 

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यावर सलमान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार एकत्र आल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेव्हापासून याची चर्चा सुरू झाली आहे. पण बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते एकत्र येण्यामागचं कारण काय होतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एक फोटो समोर आला आहे. सौदी अरेबियाच्या 'रेड सी फिल्म' फेस्टिव्हलचे अध्यक्ष मोहम्मद अल तुर्की आणि अनेक पाहुणे भारतात आले आहेत आणि त्यांचे स्वागत शाहरुख खाननं 'मन्नत'मध्ये बोलून केलं. याच कारणामुळे सलमान, सैफ आणि अक्षय 'किंग खान'च्या घरी पोहोचले होते.

अल-उलासच्या रॉयल कमिशनचे सांस्कृतिक मंत्री आणि गव्हर्नर बद्र बिन फरहान अलसौद यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते शाहरुख खान, सैफ अली खान, सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत भेटताना दिसत आहेत. 'बॉलिवुड सुपरस्टार्स सैफ, शाहरुख, अक्षय आणि सलमान खान यांना भेटलो. चित्रपट जगताबद्दल बोलण्याची आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळाली', असं कॅप्शन फोटोंना देण्यात आलं आहे. 

'पठाण'च्या शूटिंगचे शेड्यूल पूर्ण केल्यानंतर शाहरुख खानही दुबईच्या मॉलमध्ये दिसला होता. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणनं स्पेनमध्ये 'पठाण'चं शूट केलं होतं. दोघंही आता भारतात परतले आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारीला रिलीज होणार आहे. 

Web Title: bollywood shah rukh khan poses with saudi minister mohammed al turki salman khan saif ali khan and akshay kumar also spotted see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.