रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 10:02 IST2024-10-10T10:01:44+5:302024-10-10T10:02:29+5:30

रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

bollywood actress simi garewal was in love with ratan tata shared emotional post after his demise | रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."

रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."

Ratan Tata Demise: ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवालने रतन टाटा यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिमी गरेवालने रतन टाटा यांच्याबरोबरच फोटो शेअर केला आहे. "ते म्हणतात तुम्ही गेलात...पण, हे नुकसान भरुन काढणं अशक्य आहे. खूप कठीण आहे", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. 

सिमी गरेवाल आणि रतन टाटा यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. एकेकाळी सिमी रतन टाटांच्या प्रेमात होती. एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं होतं. काही काळ रतन टाटा आणि सिमी गरेवाल यांनी एकमेकांना डेट केलं होतं. ते दोघं लग्नही करणार होते. पण, नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याचं सिमीने सांगितलं होतं. पण, त्यांच्यातील मैत्री कायम राहिली, असंही ती म्हणाली होती. 

"त्यांचं आणि माझं नातं हे अनेक वर्षांपासूनच होतं. ते एक उत्तम व्यक्ती आहेत. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमरही कमालीचा आहे. ते जेंटलमॅन आहेत. त्यांच्यासाठी कधीच पैसा महत्त्वाचा नव्हता. भारतात त्यांना तितकं रिलॅक्सपणे राहता येत नाही, जेवढं ते विदेशात राहू शकतात", असं सिमी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. 

Web Title: bollywood actress simi garewal was in love with ratan tata shared emotional post after his demise