"लग्न न करताही मुलं होऊ शकतात...", बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:53 IST2026-04-27T15:53:13+5:302026-04-27T15:53:55+5:30

"लग्न न करताही मुलं होऊ शकतात. मूल होण्यासाठी लग्न करण्याची गरज नाही", असं नित्या एका मुलाखतीत म्हणाली आहे.

bollywood actress nithya menen said you can have children without marriage | "लग्न न करताही मुलं होऊ शकतात...", बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाली?

"लग्न न करताही मुलं होऊ शकतात...", बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाली?

साऊथ आणि बॉलिवूड अभिनेत्री नित्या मेनन तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नित्याने लग्न आणि मुलांबद्दल विधान केलं आहे. "लग्न न करताही मुलं होऊ शकतात. मूल होण्यासाठी लग्न करण्याची गरज नाही", असं नित्या एका मुलाखतीत म्हणाली आहे. नित्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. नेमकं नित्या काय म्हणाली आहे ते पाहुयात.

नित्या मेनने इंडिया ग्लिट्ज तमिलला दिलेल्या मुलाखतीत असं विधान केलं आहे. "लग्न न करताही मुलं होऊ शकतात. मूल होण्यासाठी लग्न करण्याची गरज नाही. आजच्या काळात विज्ञानाच्या मदतीने आपल्याकडे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपण सिंगल पालक बनू शकतो. मुलांचा आनंद आणि त्यांच्या संस्कारासाठी लग्नाची आवश्यकता नाही", असं ती म्हणाली. 


नित्याने या मुलाखतीत लग्नाबद्दलही भाष्य केलं. ती म्हणाली, "लग्न हा जीवनाचा एक भाग आहे. पण, लग्न म्हणजेच आयुष्य नाही. माझ्यासाठी स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे. खरं प्रेम मिळालं तर मी नक्कीच लग्न करेन. पण, लग्न केलं नाही म्हणून आयुष्य थांबत नाही. लग्न झालं नाही म्हणून आयुष्य अपूर्ण आहे, असंही नाही".

'थलायवन थलायवी', 'सन ऑफ सत्यमूर्ती', '१०० डेज ऑफ लव्ह', 'कंचना २', 'रुद्रमादेवी', 'वीप्पम', 'रायान' अशा अनेक साऊथ सिनेमांमध्ये नित्याने काम केलं आहे. 'मिशन मंगल' या बॉलिवूड सिनेमात ती झळकली होती. या सिनेमाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. काही मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. 

Web Title : नित्या मेनन: शादी के बिना भी बच्चे संभव, बॉलीवुड अभिनेत्री का बयान

Web Summary : अभिनेत्री नित्या मेनन ने कहा कि बच्चे पैदा करने के लिए शादी जरूरी नहीं है, जिससे बहस छिड़ गई। विज्ञान एकल अभिभावक बनने के विकल्प प्रदान करता है; बच्चे के पालन-पोषण के लिए शादी आवश्यक नहीं है। वह स्वतंत्रता को महत्व देती हैं और केवल सच्चे प्यार के लिए ही शादी करेंगी।

Web Title : Nithya Menen: Children possible without marriage, says Bollywood actress.

Web Summary : Actress Nithya Menen sparked debate by stating marriage isn't necessary for having children. Science offers options for single parenthood; marriage isn't essential for a child's upbringing. She values freedom and would marry only for true love.