'तो मला स्मशानात घेऊन जात होता'; बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी घडला भुताटकीचा प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:23 PM2023-07-28T15:23:24+5:302023-07-28T15:24:01+5:30

Bollywood actress: बराच संघर्ष, कष्ट केल्यानंतर तिने तिच्या हक्काचं घर घेतलं. मात्र, या नव्या घरात तिला चित्रविचित्र अनुभव येऊ लागले.

bollywood actress-nargis-fakhri-shares-her-haunted-experience-she-had-in-mumbai | 'तो मला स्मशानात घेऊन जात होता'; बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी घडला भुताटकीचा प्रकार?

'तो मला स्मशानात घेऊन जात होता'; बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी घडला भुताटकीचा प्रकार?

googlenewsNext

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. रॉकस्टार या सिनेमातून नर्गिसने कलाविश्वात पदार्पण केलं. बऱ्याचदा ही अभिनेत्री तिच्या अभिनयापेक्षा स्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येते. परंतु, यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईत आल्यानंतर तिला भूतांचा अनुभव आला होता असं तिने म्हटलं आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं आहे.

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेल्या नर्गिसला सुरुवातीला बराच स्ट्रगल करावा लागला. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस ती भाड्याच्या घरात राहत होती. बराच संघर्ष, कष्ट केल्यानंतर नर्गिसने तिच्या हक्काचं घर घेतलं. मात्र, या नव्या घरात तिला चित्रविचित्र अनुभव येऊ लागले. हे अनुभव इतके भयावह होते की त्याविषयी बोलतानादेखील तिच्या अंगावर काटा उभा राहत होता.

"मी मुंबईत जेव्हा स्वत:चं घर घेतलं त्यावेळी मी खूप आनंदात होते. कारण, माझ्या मेहनतीच्या जोरावर मी ते घेतलं होतं. हिल रोडवर असलेल्या स्मशानभूमीच्या जवळ माझं घर होतं. त्या घरात राहत असताना मला रोज विचित्र स्वप्न पडायची. अचानकपणे रात्री कधीही जाग यायची. जी स्वप्न पडायची ती अत्यंत भीतीदायक होती. एक सहा फूट उंच पांढरे कपडे घातलेला माणूस मला स्मशानभूमीकडे घेऊन जातोय तो स्मशानातली माती हाताने खणतो आणि माणसांची हाडे बाहेर काढतो. तो स्वत: तिथलं मांस खातो आणि मलाही खायला सांगतोय असं त्या स्वप्नात दिसायचं. सलग चार रात्री मला हे स्वप्न पडलं", असं नर्गिस म्हणाली.

पुढे ती म्हणते, "त्या घरात मी फक्त ४ दिवस राहिले. त्यानंतर मी मुंबई सोडून दिल्लीला शिफ्ट झाले. परंतु, मुंबईतल्या त्या घरातील माझं सामान पॅक करायला जी माणसं आली होती त्यांनी मला सांगितलं की, त्या घरात त्यांना माझ्या खोलीत ६ मृत पक्षी सापडले. त्या घरात काय सुरु आहे. याची मला कल्पनाही नव्हती."
दरम्यान, सध्या नर्गिसचा हा अनुभव सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. अनेकांनी त्यावर मत मांडली आहेत. यात काहींनी तिचा भ्रम असल्याचं म्हटलं आहे. तर, काहींच्या मते, खरोखरच काही नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला असतात असं म्हटलं आहे.
 

Web Title: bollywood actress-nargis-fakhri-shares-her-haunted-experience-she-had-in-mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.