कुणी तरी येणार येणार गं...! वरूण धवन होणार बाबा; फोटो शेअर करत दिली खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 06:00 PM2024-02-18T18:00:59+5:302024-02-18T18:05:47+5:30

Varun Dhawan And Natasha Dalal: बॉलिवूड अभिनेता वरूण धवन लवकरच बाबा होणार आहे.

Bollywood actor Varun Dhawan is going to be a father soon and his wife Natasha Dalal is pregnant, see photo | कुणी तरी येणार येणार गं...! वरूण धवन होणार बाबा; फोटो शेअर करत दिली खुशखबर

कुणी तरी येणार येणार गं...! वरूण धवन होणार बाबा; फोटो शेअर करत दिली खुशखबर

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता वरूण धवन लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी नताशा दलाल गर्भवती असून ती बाळाला जन्म देणार आहे. वरूणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. फोटोमध्ये पाहायला मिळते की, वरुण धवन नताशा दलालच्या बेबी बंपचे चुंबन घेतो. लग्नाच्या ३ वर्षानंतर हे कपल आई-बाबा बनणार आहे. फोटो शेअर करताना वरुणने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "आम्ही प्रेग्नंट आहोत. तुमचा आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे."

एकीकडे बॉलिवूडमध्ये सर्वत्र लग्नाचे वारे वाहत आहे, तर दुसरीकडे, अनेक सेलेब्सच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. नुकताच विक्रांत मेसी बाबा झाला आहे. अलीकडेच अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली. आता या यादीत आणखी एका बॉलिवूड कपलचा समावेश झाला आहे. कारण अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल लवकरच आई-बाबा होणार आहेत. हे जोडपे लवकरच पालक होणार आहे. खुद्द अभिनेत्याने ही माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

दरम्यान, वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाह २४ जानेवारी २०२१ रोजी झाला. वरूण आणि नताशा बालपणीचे मित्र आहेत आणि इयत्ता सहावीपासून एकत्र असून त्यांच्या मैत्रीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले. नताशा ही मुंबईची प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने न्यूयॉर्कच्या फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आहे.

Web Title: Bollywood actor Varun Dhawan is going to be a father soon and his wife Natasha Dalal is pregnant, see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.