"घरात एकटा पुरुष असल्यानं पालकांच्या मनात भीती...", घटस्फोटानंतर मुलीचा सांभाळ करताना अभिनेत्याला आले 'असे' अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:30 IST2026-05-18T12:25:31+5:302026-05-18T12:30:32+5:30
"लेकीच्या मैत्रीणींना पालक घरी खेळायला पाठवत नाहीत, कारण...", सिंगल फादर असलेल्या इमरान खानने सांगितला धक्कादायक अनुभव

"घरात एकटा पुरुष असल्यानं पालकांच्या मनात भीती...", घटस्फोटानंतर मुलीचा सांभाळ करताना अभिनेत्याला आले 'असे' अनुभव
Actor Imran Khan: आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान हा सध्या इंडस्ट्रीत फारसा सक्रिय नाही.मात्र, तो त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो याशिवाय इमरान विविध मुलाखतींमुळं सतत चर्चेत असतो. इमरान खानचा काही वर्षांपूर्वी अवंतिका मलिकबरोबर घटस्फोट झाला.त्याला इमारा नावाची मुलगी देखील आहे. घटस्फोटानंतर तो लेक इमाराचं एकट्याने संगोपन करतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने एकल पालकत्व आणि घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
अभिनेता इमरान खानने अलीकडेच परिणीती चोप्राच्या 'मॉम टॉक्स' या पॉडकास्टमध्ये सिंगल फादर म्हणून आपल्या मुलीचा सांभाळ करताना येणाऱ्या एका अत्यंत भावनिक आणि अडचणींचा खुलासा केला. यावेळी अभिनेत्याने सांगितलं की, "जेव्हा इमारा त्याच्या घरी असते, तेव्हा तिला तिच्या मैत्रिणींसोबत खेळायचं असतं. मात्र, जेव्हा तो इमाराच्या मैत्रिणींच्या आईला फोन किंवा मेसेज करतो, तेव्हा त्यांच्याकडून नेहमी काही ना काही कारणं सांगून नकार देतात. त्याच्या घरी महिला नसल्यामुळे त्याची मुलगी इमाराच्या मैत्रिणी घरी येत नाहीत, कारण त्यांचे पालक आपल्या मुलींना पाठवायला घाबरतात किंवा त्यांच्या मनात नको ते विचार येतात, असं इमराननं सांगितलं. यावर अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील दु:ख व्यक्त केलं.
या पॉडकास्टमध्ये इम्रानने खुलासा केला की, तो आणि अवंतिका दोघांकडे मुलीची संयुक्त कस्टडी आहे. त्यामुळे अवंतिका आठवड्यातून तीन ते चार दिवस त्याच्यासोबत घालवते, असा खुलासा त्याने केला. दरम्यान अभिनेता म्हणाला,"इमारा घरी असली की मी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतो.तेव्हा इमारा मला विचारायची,'बाबा तू माझ्या या मैत्रिणीला घरी खेळायला बोलवू शकतोस का?' मग मी त्या मुलीच्या नंबर शोधून तिच्या आईला मेसेज करायचो.पण, समोरून नेहमीच नकार यायचा. त्यानंतर पुढच्या आठवड्यात विचारल्यानंतर पुन्हा तेच उत्तर,आज ट्युशन आहे, नाही जमणार.त्यानंतर माझ्या लक्षात येऊ लागलं की,काही पालक आपल्या मुलांना, विशेषतः मुलीला, अशा घरात पाठवायला घाबरतात जिथे फक्त पुरुष राहतो, कोणीही महिला नाही."
आपण अशा जगात राहतो..
"मी एक पुरुष आणि वडील सुद्धा आहे, पण आता माझा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे घरात कोणीही स्त्री नाही.आज आपण अशा जगात राहतो. जिथे काही विकृत पुरुषही आहेत. त्यामुळे पालकांच्या मनातील ही भीती मी समजू शकतो.शिवाय प्रत्येक आठवड्याला मी माझ्या 'सॉरी बेटा, तुझी मैत्रीण आज येऊ शकत नाही' असं सांगणं अवघड जातं." असं अभिनेत्याने सांगितलं.