बिपाशा बसु बर्थडे स्पेशल : बिप्सचे ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 13:11 IST2017-01-07T13:06:01+5:302017-01-07T13:11:33+5:30

वयाच्या अवघ्या १७व्या वर्षीच मॉडेलिंगच्या विश्वात जिने पाऊल ठेवले अन् तिच्या ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ अंदाजाने सर्वांना घायाळ केले अशी ...

Bipasha Basu Birthday Special: Bipesh's 'Hot and Sexy' photo | बिपाशा बसु बर्थडे स्पेशल : बिप्सचे ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ फोटो

बिपाशा बसु बर्थडे स्पेशल : बिप्सचे ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ फोटो

ाच्या अवघ्या १७व्या वर्षीच मॉडेलिंगच्या विश्वात जिने पाऊल ठेवले अन् तिच्या ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ अंदाजाने सर्वांना घायाळ केले अशी मॉडेल, अभिनेत्री म्हणजे बिपाशा बसु. अख्खं ‘बी टाऊन’ तिला ‘बिप्स’ या नावानं ओळखतं आणि आता अर्थात मिसेस करणसिंग ग्रोव्हर म्हणूनही. आज बिप्सचा वाढदिवस. ती तिचा स्पेशल बर्थडे आॅस्ट्रेलियात हबी करणसिंग ग्रोव्हरसोबत सेलिब्रेट करतेय. बिप्सला ‘सीएनएक्स मस्ती’ टीमकडून खुप खुप शुभेच्छा....पाहूयात, तिच्या आत्तापर्यंतच्या बॉलिवूडच्या जर्नीतील काही हॉट अ‍ॅण्ड सेक्सी फोटो....

                                                

                                                  

                                                 

                                                  

                                                 

                                                  

                         

                         

                         

२००१ मध्ये तिने अब्बास-मस्तान यांच्या रोमँटिक-थ्रिलर ‘अजनबी’ मधून बी टाऊन मध्ये डेब्यू केला. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने प्रचंड कमाई केली.  तिला या चित्रपटासाठी ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू फिमेल’ अ‍ॅवॉर्ड मिळाला. त्यानंतर २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राझ’ची तिला आॅफर आली. ‘राझ’ मुळे तिचे नाव तेव्हाच्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये नोंदवले गेले. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिस्म’ चित्रपटामुळे तिला फेम आणि यश दोन्हीही मिळालं. तिच्या बोल्ड आणि सेक्सी अवताराची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमानसोबत नेहमीच केली जाते. बिपाशा बसु देखील तिची केलेली झीनतसोबतची तुलना एन्जॉय करते. बिप्सने आत्ताापर्यंत रोमँटिक, अ‍ॅक्शन, थ्रिलर या सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच पती करण सिंग ग्रोव्हरसोबत तिने ‘अलोन’ या चित्रपटात काम केले. चाहत्यांनाही त्यांची पती-पत्नीची जोडी आॅनस्क्रीन पहायला प्रचंड आवडली. त्या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाला ‘मंकी लव्ह’ असे नाव दिले आहे. एकदम हटके आणि लव्हिंग असलेल्या या जोडीवर प्रेक्षक तुफान प्रेम करतात. 

 

Web Title: Bipasha Basu Birthday Special: Bipesh's 'Hot and Sexy' photo