​ -तर ‘बीबीडी’मध्ये सिद्धार्थऐवजी दिसला असता हा स्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 16:55 IST2016-09-04T11:25:32+5:302016-09-04T16:55:32+5:30

सध्या सिद्धार्थ मल्होत्रा व कॅटरिना कैफ ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. या जोडीचा ‘बार बार देखो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या ...

The 'BDD' will be seen instead of Siddhartha star! | ​ -तर ‘बीबीडी’मध्ये सिद्धार्थऐवजी दिसला असता हा स्टार!

​ -तर ‘बीबीडी’मध्ये सिद्धार्थऐवजी दिसला असता हा स्टार!

्या सिद्धार्थ मल्होत्रा व कॅटरिना कैफ ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. या जोडीचा ‘बार बार देखो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात कॅटरिना पहिल्यांदा सिद्धार्थसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. मात्र तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल. या चित्रपटातील सिद्धार्थची भूमिका सर्वप्रथम आमीर खानला आॅफर केली गेली होती. होय, ‘बार बार देखो’साठी सिद्धार्थऐवजी आमीरशी संपर्क केला गेला होता. आमीरला या चित्रपटाची स्क्रिप्टही आवडली होती. मात्र डेट्स नसल्याने आमीरने या चित्रपटास नकार दिला आणि या चित्रपटात आमीरऐवजी सिद्धार्थची वर्णी लागली. खरे तर जे झाले ते योग्यच झाले, असेच आता वाटतेयं. कारण पडद्यावरची सिद्धार्थ आणि कॅटरिनाची केमिस्ट्री घायाळ करणारी आहे. प्रेक्षकांनीही या जोडीला आपली पसंती दिली आहे.

Web Title: The 'BDD' will be seen instead of Siddhartha star!