​बराक ओबामा संजय दत्तला ओळखतात या नावाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 11:53 IST2018-04-25T06:23:33+5:302018-04-25T11:53:33+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा संजय दत्तला संजय दत्त या नावाने नव्हे तर मुन्नाभाई या नावाने ओळखतात. गेल्या अनेक दिवसांपासून ...

Barack Obama recognizes Sanjay Dutt as the name | ​बराक ओबामा संजय दत्तला ओळखतात या नावाने

​बराक ओबामा संजय दत्तला ओळखतात या नावाने

ेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा संजय दत्तला संजय दत्त या नावाने नव्हे तर मुन्नाभाई या नावाने ओळखतात. गेल्या अनेक दिवसांपासून संजय दत्तचे फॅन्स त्याच्या बायोपिकच्या टीझर आणि पोस्टर लाँच कधी होतेय याची वाट मोठ्या आतुरतेने बघत होते. नुकतेच 'संजू'चे पहिले पोस्टर आणि टीझरदेखील रिलीज करण्यात आले. या टीझर लाँचच्या वेळी संजय दत्ताच्या आयुष्याविषयी काही सिक्रेट त्याच्या मित्रांनी सांगितले. 
संजय दत्त आणि बराक ओबामा यांची २००४च्या सुमारास भेट झाली होती. त्यावेळी मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यामुळे संजय दत्तची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे सगळेच संजय दत्तला मुन्नाभाई या नावाने हाक मारायला लागले होते. बराक ओबामा देखील संजय दत्तला मुन्नाभाई याच नावाने ओळखत असल्याचे संजयला त्यावेळी कळले होते. 
संजू या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना उलगडण्यात येणार आहेत. संजू या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या पाच वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतो आहे. पोस्टर पाहताच तुमच्या लक्षात येईल की पहिल्या फोटोत संजय दत्तचे इंडस्ट्रतील सुरुवातीचे दिवस दाखवण्यात येणार आहेत. चित्रपटात 'मुन्ना भाई एमबीबीएस’चित्रपटाचा देखील विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. याला कारण ही तसेच आहे. हा चित्रपट संजय दत्तच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरला होता. या चित्रपटाने रसिकांची पसंती तर मिळवली होतीच तसेच संजय दत्तची इमेज देखील बदलण्यास मदत केली. त्यामुळे संजयच्या आयुष्यात या चित्रपटाला खूप महत्त्व आहे. संजय आणि मुन्नाभाई सिरिजचे खूप जवळचे नाते आहे. हा चित्रपट त्याच्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग देखील प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे.
संजूची भूमिका साकाराण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. चित्रपट विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करत आहेत. त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अॅपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित केला जाईल. 

Also Read : या गोष्टीची वाटतेय संजय दत्तला भीती... संजूच्या टीझर लाँचवेळी सांगितले हे सिक्रेट


Web Title: Barack Obama recognizes Sanjay Dutt as the name