आशा भोसले यांच्या आठवणीत नात जनाई भावुक, म्हणाली "आजी म्हणायची जीवन पुढे चालत राहायला हवं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:02 IST2026-04-17T16:02:02+5:302026-04-17T16:02:35+5:30

आशाताईंच्या जाण्यानं फक्त सिनेसृष्टीच नाहीतर, अख्खा देश शोकसागरात बुडालाय.

Asha Bhosle Death Granddaughter Zanai Bhosle Emotional Post | आशा भोसले यांच्या आठवणीत नात जनाई भावुक, म्हणाली "आजी म्हणायची जीवन पुढे चालत राहायला हवं"

आशा भोसले यांच्या आठवणीत नात जनाई भावुक, म्हणाली "आजी म्हणायची जीवन पुढे चालत राहायला हवं"

Asha Bhosle :भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Singer Asha Bhosle) यांनी १२ एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. तर १३ एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला. आशाताईंच्या जाण्यानं फक्त सिनेसृष्टीच नाहीतर, अख्खा देश शोकसागरात बुडालाय. आशा भोसले यांचं नात जनाई भोसलेशी खूप जवळचं नातं होतं. जनाई कायम आजीची सावली बनून राहायची. त्यांच्या निधनानंतर जनाई भोसले अक्षरश: कोसळून गेली. आपल्या आजीच्या आठवणीत पोस्ट शेअर करत जनाईनं  भावना व्यक्त केल्या आहेत.

जनाईने इन्स्टाग्राम स्टोरीवर उगवत्या सूर्याचा सुंदर फोटो शेअर करत लिहिलं, "सूर्य रोज उगवतो आणि मावळतो, आणि माझी आजी म्हणायची तसं, जीवन पुढे चालत राहायला हवं. मला ऑनलाईन मेसेज करणाऱ्यांचे आभार. आजीबद्दलचे तुमचे प्रेम पाहून मला दिलासा मिळतो. स्वत:ची काळजी घ्या", असं तिनं म्हटलं. तसेच, जनाईने सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात लहान असलेली जनाई आजीच्या मांडीवर बसलेली दिसतेय.

जनाई भोसले काय करते?
जनाईने आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिचे 'केहंदी है' हे गाणे गाजले असून स्वतः आशाताईंनी तिचे कौतुक केले होते. गायनासोबतच जनाई आता अभिनयाच्या जगातही पाऊल ठेवणार आहे. 'द प्राइड ऑफ भारत- छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून ती पदार्पण करत आहे. आजीने नेहमीच तिला प्रोत्साहन दिले होते, मात्र करिअरच्या या महत्त्वाच्या वळणावर आजीची साथ सुटल्याने जनाईला मोठा धक्का बसला आहे.


Web Title : आशा भोसले की पोती जनाई अपनी दादी को याद कर भावुक हुईं: "जीवन चलता रहना चाहिए"

Web Summary : आशा भोसले की पोती, जनाई भोसले ने अपनी दादी के निधन के बाद हार्दिक यादें साझा कीं। जनाई ने जीवन के आगे बढ़ने के बारे में पोस्ट किया और मिले समर्थन के लिए आभार व्यक्त किया। उन्होंने अपनी दादी के साथ एक बचपन का वीडियो भी साझा किया, जिन्होंने संगीत और अभिनय करियर में उनका उत्साहवर्धन किया।

Web Title : Asha Bhosle's Granddaughter Janai Emotional Remembering Her: "Life Must Go On"

Web Summary : Asha Bhosle's granddaughter, Janai Bhosle, shared heartfelt memories after her grandmother's passing. Janai posted about life moving forward, expressing gratitude for the support received. She also shared a touching childhood video with her grandmother, who encouraged her music and acting career.