अर्शी खान अन् सपना चौधरीने चक्क सनी लिओनीला दिली टक्कर, वाचा काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 09:15 AM2017-12-14T09:15:00+5:302017-12-14T14:45:24+5:30

गुगलने २०१७ चे त्यांचे टॉप ट्रेंड घोषित केले असून, पुन्हा एकदा यामध्ये आयटम गर्ल सनी लिओनी हिने बाजी मारली आहे.

Arshi Khan and Sapna Chaudhary have played a role in Sunny Leone, read what is the matter! | अर्शी खान अन् सपना चौधरीने चक्क सनी लिओनीला दिली टक्कर, वाचा काय आहे प्रकरण!

अर्शी खान अन् सपना चौधरीने चक्क सनी लिओनीला दिली टक्कर, वाचा काय आहे प्रकरण!

googlenewsNext
गलने २०१७ चे त्यांचे टॉप ट्रेंड घोषित केले असून, गुगलवर सनी लिओनीचा जलवा कायम असल्याचे दिसून आले. कारण पुन्हा एकदा सनीने भारतातील टॉप एंटरटेनर्सच्या यादीतील आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. परंतु यावेळेस तिला हे स्थान कायम ठेवण्यासाठी बिग बॉस स्पर्धक अर्शी खान आणि सपना चौधरी यांचा सामना करावा लागला. या दोघींनी तिला कडवी टक्कर देताना अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले. पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेल्या सनीची लोकप्रियता आजही प्रचंड आहे. आयटम गर्ल अशी ओळख मिळालेल्या सनीने यावर्षी एक मुलगी दत्तक घेतल्याने ती चांगलीच चर्चेत राहिली. खरं तर सनीने काहीही केले तरी ती चर्चेचा विषय बनते. 

दरम्यान, कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अर्शी खान हिला यादीत दुसरे स्थान मिळाले. बिग बॉसच्या घरात आतापर्यंत यशस्वी प्रवास करणारी अर्शी अनेक अर्थांनी चर्चेत राहिली. घरातील तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला. आजही ती घरात बिंधास्त वावरत असून, तिच्या अदा प्रेक्षकांना घायाळ करीत आहेत, तर तिसºया स्थानावर बिग बॉसचीच स्पर्धक हरियानवी डान्सर सपना चौधरी हिला संधी मिळाली. सध्या सपना बिग बॉसच्या बाहेर पडली असली तरी, तिला कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली. 
 

चौथ्या स्थानावर यू-ट्यूब सनसनी विद्या वॉक्स, पाचव्या स्थानी अभिनेत्री दिशा पाटनी यांनी बाजी मारली. दिशा टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड असून, ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करून खळबळ उडवून देत असते. याव्यतिरिक्त कॉमेडियन सुनील ग्रोवर, भाभीजी शिल्पा शिंदे, बंदगी कालरा, जहीर खानची पत्नी सागरिका घाटगे, बाहुबली स्टार राणा डग्गुबत्ती यांनीही या यादीत स्थान मिळविले आहे. 

Web Title: Arshi Khan and Sapna Chaudhary have played a role in Sunny Leone, read what is the matter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.