वडिलांच्या दुसऱ्या लग्नात मिरवला मुलगा, अरबाज-शूरासाठी अरहान खानचा जबरदस्त परफॉर्मन्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 02:04 PM2023-12-25T14:04:14+5:302023-12-25T14:07:21+5:30

अरबाज आणि शुराचा लग्नसोहळा २४ डिसेंबरला मोठ्या थाटामाटात पार पडला.

Arhaan Khan's stunning performance for Arbaaz-Shura in there marriage | वडिलांच्या दुसऱ्या लग्नात मिरवला मुलगा, अरबाज-शूरासाठी अरहान खानचा जबरदस्त परफॉर्मन्स!

वडिलांच्या दुसऱ्या लग्नात मिरवला मुलगा, अरबाज-शूरासाठी अरहान खानचा जबरदस्त परफॉर्मन्स!

प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानने शुरा खानबरोबर दुसरं लग्न केलं. २४ डिसेंबरला कुटुंबीय व मोजक्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत बहीण अर्पिता खानच्या घरी अरबाज आणि शुराचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अरबाजने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात मुलगा अरहाननेही हजेरी लावली होती. 

 सध्या अरबाज आणि शुराच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आले आहेत. यामधील अरहान खानच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तो फक्त लग्नात उपस्थित राहिला नाही. तर त्याने अरबाज-शूरासाठी जबरदस्त परफॉर्मन्स केला. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान गिटार वाजवताना पाहायला मिळाला. अरहानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

अरबाज खान आणि शूराच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये सलमानसोबत अरहान डान्स करताना दिसत आहे. अरहान त्याच्या वडिलांच्या लग्नामध्ये खूप आनंदी असल्याचे दिसून आलं. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 1998 मध्ये लग्न केले होते. 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांचा अधिकृत घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायकाला मुलगा अरहानची कस्टडी मिळाली. अरहान खान हा मलायका आणि अरबाजचा एकुलता एक मुलगा आहे. 

Web Title: Arhaan Khan's stunning performance for Arbaaz-Shura in there marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.