वयाच्या 56 व्या वर्षी अरबाजने केलं दुसऱ्यांदा लग्न; शुरासोबत पार पडला निकाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 09:34 AM2023-12-25T09:34:35+5:302023-12-25T09:35:29+5:30

Arbaaz khan wedding: अरबाजच्या निकाहला त्याच्या लेकाने अरहान याने सुद्धा हजेरी लावली होती.

arbaaz-khan-wedding-pic-shared-with-second-wife-shura-khan-viral | वयाच्या 56 व्या वर्षी अरबाजने केलं दुसऱ्यांदा लग्न; शुरासोबत पार पडला निकाह सोहळा

वयाच्या 56 व्या वर्षी अरबाजने केलं दुसऱ्यांदा लग्न; शुरासोबत पार पडला निकाह सोहळा

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि मेकअप आर्टिस्ट शूरा खान  (Sshura Khan) यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा रंगली होती.जॉर्जिया एंड्रियानीनंतर अरबाज शूराला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. या चर्चांमध्येच अरबाजने शूरासोबत थेट निकाह करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.  अरबाजने त्यांच्या निकाहचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती अरबाज-शुराने लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे अत्यंच गोपनीय पद्धतीने हा निकाह सोहळा झाला. या लग्नसोहळ्याला अरबाजचा लेक अरहान खान सुद्धा उपस्थित होता. अरबाजचा-शुराचा हा निकाह सोहळा अर्पिता खानच्या घरी पार पडला.

साध्या पद्धतीने झाला निकाह

अरबाज आणि शुरा यांनी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने निकाह केला. यावेळी अरबाजने फ्लोरल प्रिंट असलेली शेरवानी परिधान केली होती. तर, शुराने अरबाजला मॅच होणाऱ्या प्रिंटचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. यावेळी शुरानेही कमीत कमी मेकअप आणि ज्वेलरी घातली होती. परंतु, या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

'या' सेलिब्रिटींनी लावली अरबाजच्या निकाहला हजेरी

अरबाज-शुराच्या निकाहमध्ये रितेश देशमुख,जेनेलिया देशमुख, बाबा सिद्दीकी, सलमा खान, हर्षदीप कौर आणि युलिया वंतूर यांनी हजेरी लावली होती.

सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

अरबाजच्या निकाहला अभिनेत्री रविना टंडनने लेक राशासोबत हजेरी लावली होती. या निकाहनंतर तिने एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर करत या जोडीला सुभेच्छा दिल्या होत्या.

२०१७ मध्ये अरबाज- मलायकाचा झाला घटस्फोट

१९९८ मध्ये अरबाज आणि मलायका या जोडीने लग्नगाठ बांधली होती. मात्र, २०१७ मध्ये ते कायदेशीररित्या विभक्त झाले. या दोघांना अरहान हा एकुलता एक मुलगा असून घटस्फोटानंतरही ही जोडी त्याचा व्यवस्थित सांभाळ करत आहेत. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Web Title: arbaaz-khan-wedding-pic-shared-with-second-wife-shura-khan-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.