'जमाल कुडु' गाण्यातील 'ती' तरुणी कोण? तृप्ती डिमरीनंतर दुसरी नॅशनल क्रश, २५ पटीने वाढले इन्स्टाग्राम फॉलोवर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:08 PM2023-12-15T16:08:44+5:302023-12-15T16:13:51+5:30

'जमाल कुडु' गाण्यात काही मुली गाणं गाताना दिसत आहेत. यातीलच एक तरुणी सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.

animal movie who is jamal kudu viral girl tannaz davoodi become 2nd national crush know about her | 'जमाल कुडु' गाण्यातील 'ती' तरुणी कोण? तृप्ती डिमरीनंतर दुसरी नॅशनल क्रश, २५ पटीने वाढले इन्स्टाग्राम फॉलोवर्स

'जमाल कुडु' गाण्यातील 'ती' तरुणी कोण? तृप्ती डिमरीनंतर दुसरी नॅशनल क्रश, २५ पटीने वाढले इन्स्टाग्राम फॉलोवर्स

सध्या जिकडेतिकडे 'ॲनिमल'ची चर्चा सुरू आहे. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटातील सीन्स, डायलॉग आणि गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. 'ॲनिमल'मधील जमाल कुडु गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. सिनेमातील बॉबी देओलच्या एन्ट्रीचं हे गाणं सोशल मीडियावर हिट ठरत आहे. पण, एका वेगळ्या कारणामुळेही हे गाणं चर्चेचा विषय ठरत आहे. 'जमाल कुडु' गाण्यात दिसणाऱ्या एका तरुणीमुळे हे गाणं चर्चेत आलं आहे. 

'जमाल कुडु' गाण्यात काही मुली गाणं गाताना दिसत आहेत. यातीलच एक तरुणी सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. 'जमाल कुडु' गाण्यातील ही तरुणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या व्हायरल झालेल्या तरुणीचं नाव तन्नाज दावूदी असं असून ती एक इराणीयन मॉडेल आणि डान्सर आहे. तृप्ती डिमरीनंतर आता तन्नाज दावूदीच्या चाहत्यांमध्ये वाढ होत आहे. 'जमाल कुडू' गाण्यानंतर तन्नाज रातोरात स्टार झाली आहे. तिच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्समध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर तन्नाज आता नॅशनल क्रशही झाली आहे. 

तन्नाज याआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. 'जमाल कुडू'मुळे प्रसिद्धीझोतात आलेली तन्नाज मुळची इराणची असून भारतात कामासाठी राहते. तिने वरुण धवन, जॉन अब्राहम, सनी लिओनी, नोरा फतेही यांच्याबरोबर काम केलं आहे. पण, जमाल कुडुमुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. तन्नाजने सुरुवातीला १० हजार फॉलोवर्स होते. आता तिच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या २.६ लाखांपर्यंत गेली आहे. 

Web Title: animal movie who is jamal kudu viral girl tannaz davoodi become 2nd national crush know about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.