परी माझी प्रेरणा-भूमी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:49 IST2016-01-16T01:08:25+5:302016-02-05T07:49:58+5:30

'दम लगा के हैशा' मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने तिच्या स्लिम ट्रीम अवताराने सर्वांना आश्‍चर्यचकित केले ...

The angel pays my inspiration to the land | परी माझी प्रेरणा-भूमी पेडणेकर

परी माझी प्रेरणा-भूमी पेडणेकर


/>'दम लगा के हैशा' मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने तिच्या स्लिम ट्रीम अवताराने सर्वांना आश्‍चर्यचकित केले आहे. परिणीती चोप्राला तिने स्वत:ची प्रेरणा मानले असून परी करत असलेल्या 'वेटलॉस' मुळे तिला उत्साह मिळवून दिल्याचे ती सांगते. तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले.

Bhumi Parineeti

भूमीला विचारण्यात आले की, ' तुझ्यामुळे परिणीतीला प्रेरणा मिळाली आहे का? तेव्हा ती म्हणाली, खरं तर नाही. कारण, परिणीती हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. तिने ज्यापद्धतीने स्वत:चे वेटलॉस केले आहे त्यावरून तिने फारच अमेझिंग काम केल्याचे मला जाणवते.'

भूमी म्हणते,' मी आयुषमान आणि विकी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. मला वाटतं की ते दोघे मिळून एक खुप छान टीम तयार होऊ शकते.'

Web Title: The angel pays my inspiration to the land