काय केलंस हे? 'एक दिवाना था' फेम अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण, सर्जरी भोवली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 10:46 AM2023-09-22T10:46:18+5:302023-09-22T10:48:14+5:30

एमीने सर्जरी केल्याचं फोटोंमधून स्पष्ट दिसून येतंय.

amy jackson trolled for her new look after surgery netizens compared her with openheimer actor cillain murphy | काय केलंस हे? 'एक दिवाना था' फेम अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण, सर्जरी भोवली

काय केलंस हे? 'एक दिवाना था' फेम अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण, सर्जरी भोवली

googlenewsNext

अभिनेता प्रतिक बब्बरचा 'एक दिवाना था' सिनेमा आठवतोय? या सिनेमात एमी जॅक्सनसोबत (Amy Jackson) त्याची केमिस्ट्री खूपच गाजली. प्रेक्षकांना ही लव्हस्टोरी भलतीच आवडली होती. सिनेमातील 'होसना' हे गाणं तर आजही लोक गुणगुणतात. इंग्लिश अभिनेत्री एमी जॅक्सन सिनेमात खूपच सुंदर दिसली. तिच्या लुकवर चाहते फिदा झाले होते. मात्र नुकताच एमीचा नवीन लुक व्हायरल होतोय ज्यात तिला ओळखणंही कठीण झालंय. सर्जरी केल्याने तिचा चेहरामोहराच बदललाय. तिची तुलना 'ओपनहायमर' फेम सिलियन मर्फीशी होत आहे.

एमी जॅक्सनने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा चेहरा अगदीच वेगळा दिसतोय. तिच्या आधीच्या लुकशी तुलना केली तर खूप मोठा फरक दिसून येतो. एमीने सर्जरी केल्याचं फोटोंमधून स्पष्ट दिसून येतंय. तिच्या डोक्यावरही केस खूपच कमी असून अगदी अर्धं टक्कल दिसून येतंय. चेहरा तर सूजलेलाच वाटतोय. एमी दोन फोटो अपलोड केले आहेत. एका फोटोत तिने लाल रंगाचा सूट घातला आहे. तर दुसऱ्या फोटोत ती मेकअप करताना दिसते. 

एमीचे हे फोटो पाहून सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं गेलं. तिचा लुक 'ओपनहायमर' चा मुख्य अभिनेता सिलियन मर्फीसारखाच दिसतोय अशा कमेंट सोशल मीडियावर आल्या. 'तू आधीच खूप सुंदर दिसायचीस' असं म्हणत तिला ट्रोलही केलं गेलं. एमीचे चाहते तिचा हा लुक पाहून चांगलेच निराश झालेत.

एमीने सप्टेंबर 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. तिचा बॉयफ्रेंड जॉर्जसह साखरपुडाही झाला होता. 2020 मध्ये त्यांचा लग्नाचा प्लॅन होता. मात्र मुलाच्या जन्मानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. 

Web Title: amy jackson trolled for her new look after surgery netizens compared her with openheimer actor cillain murphy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.