अॅमी जॅक्सन बनली रमीपॅशन डॉटकॉमची ब्रँड अम्बेसेडर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 09:16 AM2018-02-12T09:16:33+5:302018-02-12T14:46:33+5:30

ब्रिटीश मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सनने देशातील सर्वात प्रिय आणि तेजीने लोकप्रियता मिळवणारे रमी पोर्टल रम्मीपॅशन डॉटकॉम सोबत ...

Ammie Jackson became the owner of Rimepation.com's Brand Ambassador | अॅमी जॅक्सन बनली रमीपॅशन डॉटकॉमची ब्रँड अम्बेसेडर

अॅमी जॅक्सन बनली रमीपॅशन डॉटकॉमची ब्रँड अम्बेसेडर

googlenewsNext
रिटीश मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सनने देशातील सर्वात प्रिय आणि तेजीने लोकप्रियता मिळवणारे रमी पोर्टल रम्मीपॅशन डॉटकॉम सोबत भागिदारी करत पहिली त्यांची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे. लंडनच्या शेअर बाजारात नोंदणीकृत स्ट्राइड गेमिंगसोबत भागिदारी करण्याच्या तयारीत असलेल्या रमी पॅशनसाठी लाभदायक आहे. ॲमीने कॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

रमी पॅशनसोबतच्या भागिदारीसंदर्भात बोलताना अॅमी जॅक्सन म्हणाली,“कमी कालावधीत प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या आणि भारतातील रमी खेळण्याचे सर्वाधिक प्रिय स्थान झालेल्या रमी पॅशनसोबत भागिदारी करणे माझ्यासाठी अभिमानाचे आहे. या वेबसाइटच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्यावर माझ्या लक्षात आले आहे की,रमी हा कौशल्यावर आधारित खेळ आहे तसेच मेंदूची क्षमता वाढविण्याची प्रचंड क्षमता यात आहे. हा पारंपरिक पत्त्यांचा खेळ मेंदू आणि बुद्धीच्या विकासासाठी चांगला व्यायाम आहे.माझ्या हे लक्षात आले आहे की,अतिशय सूक्ष्मरितीने हा खेळ आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतो.तसेच यामुळे मला खूप उत्साह मिळतो आणि हा मनोरंजनाचे उत्तम साधनही आहे. खासकरून भारतीय चित्रपट उद्योगाचा हिस्सा झाल्यावर या देशाची परंपरा असलेला हा पत्त्यांचा खेळ खेळल्याशिवाय मला चैन पडत नाही.”

रमी पॅशनचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी बॉबी गर्ग म्हणाले, “रमी हा कौशल्याचा खेळ आहे व मेंदूचे मेहनतीच्या माध्यमातून याद्वारे मनोरंजन होते. टेकसॅव्ही असलेली अॅमी या खेळाची पुरस्कर्ती आहे व तिला खेळाचे नियम तर चांगल्यापैकी माहिती आहेतच पण खेळाच्या टिप्स, ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजीचीही तिला चांगली जाण आहे. रमीसोबत गुंग व्हायला तिला आवडते. बोल्ड, उत्साही, बहुपैलू, चतूर युथ आयकॉन असलेली अॅमी मला वाटते रमी पॅशन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य व्यक्ती आहे जी लोकांना सांगेल की रमी हा मेंदूचा खेळ आहे ज्यामध्ये कौशल्य व स्ट्रॅटेजीची आवश्यकता असते व हा केवळ जुगार नाही. आम्हाला हे देखील खासकरून नमूद करायचे आहे की, रमी पॅशन खेळाडूंना त्यांचा आवडता खेळ त्यांच्यासोयीप्रमाणे व केव्हाही, कुठेही खेळता येईल व कुठल्याही अडथळ्यांशिवाय खेळता येईल.”

Web Title: Ammie Jackson became the owner of Rimepation.com's Brand Ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.