"तो बिचारा ४५०० रुपये कमावतोय आणि गावात जाऊन..."; मुलाच्या करिअरबद्दल अक्षय कुमारचा शॉकिंग खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:04 IST2026-04-18T12:51:34+5:302026-04-18T13:04:56+5:30
अक्षयने मुलाच्या करिअरबद्दल एक शॉकिंग खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अक्षयचा लेक महिन्याचे ४५०० रुपये कमावतोय. कसे? जाणून घ्या.

"तो बिचारा ४५०० रुपये कमावतोय आणि गावात जाऊन..."; मुलाच्या करिअरबद्दल अक्षय कुमारचा शॉकिंग खुलासा
अक्षय कुमार हा बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार सध्या करिअरच्या शिखरावर आहे. अक्षयच्या एकामागोमाग एक सिनेमांचा सपाटा सध्या सुरु आहे. नुकताच अक्षयचा 'भूत बंगला' सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाच्या निमित्ताने अक्षय विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. त्यानिमित्ताने अक्षयने मुलाच्या करिअरबद्दल एक शॉकिंग खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अक्षयचा लेक महिन्याचे ४५०० रुपये कमावतोय. कसे? जाणून घ्या.
आरवने निवडलंय वेगळं करिअर
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये अक्षयने याविषयी खुलासा केला. तो म्हणाला, "मी आणि माझा मुलगा आरव आम्ही दोघेही स्वभावाने सारखेच आहोत. त्याला आरोग्याची खूप काळजी आहे आणि मलाही. तो उंच आहे आणि आपल्या कामाबद्दल तो खूप फोकस आहे. त्याला काम करायला आवडते, पण त्याला चित्रपटात येण्याची अजिबात इच्छा नाही. तसा त्याचा कोणताही प्लॅन नाही, त्याला फॅशनच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे."
४५०० रुपयांची नोकरी करतोय आरव
अक्षयने पुढे सांगितले की, आरव सध्या फॅशनमध्ये आपले भविष्य घडवत आहे आणि विशेष म्हणजे तो आजही ४५०० रुपयांची नोकरी करत आहे. अक्षय म्हणाला, "तो बिचारा आजही ४५०० रुपयांची नोकरी करत आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. तो गावागावात जाऊन तिथल्या फॅशनबद्दल, वेगवेगळ्या प्रिंट्सबद्दल माहिती घेत आहे आणि शिकत आहे. मी त्याला जास्त सल्ले देत नाही, पण मी त्याला फक्त इतकंच सांगितलं आहे की कधीही कोणाचं नुकसान करू नकोस."
आरवचे शिक्षण
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा लेक आरव १५ वर्षांचा आहे. तो उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आणि सध्या तो लंडनच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. जेव्हा कधी तो भारतात येतो, तेव्हा तो आपल्या बहिणीसोबत स्टायलिश अंदाजात दिसतो. अक्षय आणि ट्विंकल यांना २०१२ मध्ये 'नितारा' ही मुलगी झाली.
अक्षय कुमारचा चित्रपट 'भूत बंगला' प्रदर्शित झाला असून, यात तब्बू, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे विकेंडला या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.