सलमान खानआधी या व्यक्तीसोबत ऐश्वर्या राय होती नात्यात, मॉडलिंगच्या दिवसात जुळले होते नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 14:03 IST2021-06-28T13:58:56+5:302021-06-28T14:03:48+5:30

ऐश्वर्याचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आणि तिचे नाव सलमान खानशी जोडले गेले. पण त्याआधी ती एका प्रसिद्ध मॉडेलला डेट करत होती.

aishwarya rai was in relationship with rajeev mulchandani in her modelling days | सलमान खानआधी या व्यक्तीसोबत ऐश्वर्या राय होती नात्यात, मॉडलिंगच्या दिवसात जुळले होते नाते

सलमान खानआधी या व्यक्तीसोबत ऐश्वर्या राय होती नात्यात, मॉडलिंगच्या दिवसात जुळले होते नाते

ठळक मुद्देबॉलिवूडमध्ये ऐश्वर्याला जसे यश मिळाले तसे तिने राजीवला टाळायला सुरुवात केली असे म्हटले जाते.

मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्या रायच्या रूपेरी कारकिर्दीस सुरुवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. विश्वसुंदरीचा किताब पटकावणारी ऐश्वर्या रॉय बच्चनचे करोडो चाहते आहेत. ऐश्वर्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकीच तिची पर्सनल लाईफदेखील नेहमीच चर्चेत राहिली.

ऐश्वर्याचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आणि तिचे नाव सलमान खानशी जोडले गेले. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या सेटवर ही प्रेमकहानी फुलली होती. पण काहीच वर्षांत त्यांचे ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय मॉडेलिंग करत असताना ती राजीव मूलचंदानीसोबत रिलेशनशीपमध्ये होती हे खूप कमी जणांना माहिती आहे. ऐश्वर्याने हे रिलेशनशीप कधीच मीडियात कबूल केले नाही. राजीव हा त्याकाळात अतिशय प्रसिद्ध मॉडेल होता. 

बॉलिवूडमध्ये ऐश्वर्याला जसे यश मिळाले तसे तिने राजीवला टाळायला सुरुवात केली असे म्हटले जाते. राजीवनंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एंट्री झाली आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक आला पण हे नातंसुद्धा खूप काळ टिकले नाही. त्यानंतर गुरुच्या सेटवर सुरु झाली ती ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी. गुरू सिनेमाच्या प्रीमियरनंतर टोरंटोमध्ये अभिषेकने लग्नासाठी ऐश्वर्याला प्रपोज केले. ऐश्वर्याने ही अभिषेकने केलेले प्रपोजल लगेचच स्वीकारले आणि 2007 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

Web Title: aishwarya rai was in relationship with rajeev mulchandani in her modelling days