४५ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय 'ही' अभिनेत्री; म्हणाली- "थोडी भीती आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:31 IST2026-05-06T11:29:30+5:302026-05-06T11:31:15+5:30

४५ व्या वर्षीही सुप्रसिद्ध अभिनेत्री मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. सर्वांना या अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे

actress rishi kapoor is making her debut in the film industry at the age of 45 dadi ki shaadi movie | ४५ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय 'ही' अभिनेत्री; म्हणाली- "थोडी भीती आहे..."

४५ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय 'ही' अभिनेत्री; म्हणाली- "थोडी भीती आहे..."

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी वयाच्या ४५ व्या वर्षी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवत आहे. 'दादी की शादी' या चित्रपटाद्वारे ती तिचा बॉलिवूड डेब्यू करणार असून, कपूर कुटुंबात वयाच्या या टप्प्यावर अभिनयात पदार्पण करणारी ती पहिलीच व्यक्ती आहे

लेकीसोबत स्क्रीन शेअर करणं ठरलं भावनिक

रिद्धिमासाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण यात ती पहिल्यांदा आपली मुलगी समारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ४५ व्या वर्षी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर येणे हा एक वेगळा अनुभव होता. तिने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, "हा अनुभव खूप भावनिक आहे. माझे बाबा (ऋषी कपूर) नेहमी माझ्या पाठीशी आहेत आणि मला आशीर्वाद देत आहेत. या विचारानेच मला हिंमत मिळते".

या वयात काहीतरी नवीन सुरू करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. नवीन सुरुवातीची थोडी भीती आणि तेवढीच उत्सुकता मनात आहे, असंही तिने मान्य केले. या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने तिने आपल्या मुलीला पहिल्यांदा घरी एकटे सोडले होते. 

'दादी की शादी' या चित्रपटात एक अतिशय खास क्षण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील 'सेंटी' गाण्यात रिद्धिमा, तिची आई नीतू कपूर आणि मुलगी समारा अशा तिन्ही पिढ्या एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात नीतू कपूर आणि कपिल शर्मा मुख्य भूमिकेत असून सादिया खतीब देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आशिष आर. मोहन यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. एका कुटुंबातील प्रेम आणि काही रहस्य यावर आधारित असलेला हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title : रिद्धिमा कपूर साहनी ने 45 की उम्र में बॉलीवुड में डेब्यू किया, घबराई हुई हैं।

Web Summary : ऋषि और नीतू कपूर की बेटी रिद्धिमा कपूर साहनी ने 45 साल की उम्र में 'दादी की शादी' से बॉलीवुड में डेब्यू किया, अपनी बेटी के साथ स्क्रीन साझा किया। उन्होंने उत्साह और घबराहट व्यक्त की, अपने पिता के आशीर्वाद में ताकत पाई। फिल्म 8 मई, 2026 को रिलीज होगी।

Web Title : Riddhima Kapoor Sahni debuts in Bollywood at 45, feels nervous.

Web Summary : Riddhima Kapoor Sahni, Rishi and Neetu Kapoor's daughter, makes her Bollywood debut at 45 with 'Daadi Ki Shaadi', sharing screen with her daughter. She expresses excitement and nervousness, finding strength in her father's blessings. The film releases May 8, 2026.