डेस्टिनेशन वेडिंग टाळून घराच्या छतावर लग्न का केलं? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:07 IST2026-04-16T11:51:02+5:302026-04-16T12:07:10+5:30

कसलाही गाजावाजा न करता घराच्या छतावर नोंदणी पद्धतीने केलं लग्न! अभिनेत्रीने सांगितलं यामागचं कारण, म्हणाली...

actress krirtik kamra reveals about why she and gaurav kapur skipped destination weddding says | डेस्टिनेशन वेडिंग टाळून घराच्या छतावर लग्न का केलं? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली...

डेस्टिनेशन वेडिंग टाळून घराच्या छतावर लग्न का केलं? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली...

Kritika Kamra: लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आपला लग्नसोहळा थाटात व्हावा आणि तो सगळ्यांच्या लक्षात राहावा, यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. संगीत, हळद आणि लग्न असा आजकाल जणू ट्रेंण्ड बनलाय. मात्र, याला हिंदी कलाविश्वातील एक अभिनेत्री अपवाद ठरली आहे.ही अभिनेत्री म्हणजे कृतिका कामरा. अलिकडेच कृतिकाने गौरव कपूरसोबत अत्यंत साधेपणाने लग्नगाठ अडकले. कोणताही बडेजाव न करता कृतिका-गौरवने मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित घराच्या छतावर लग्न केलं.आता कृतिकाने अशा पद्धतीने लग्न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

कृतिका कामरा आणि गौरव कपूर यांचा विवाहसोहळा नोंदणीकृत पद्धतीने पार पडला आहे.कृतिकाचा नवरा गौरव कपूर हा एक टेलिव्हिजन प्रेझेंटर आणि क्रिके़ट कॉमेंटेटर आहे.अलिकडेच ११ मार्चला वांद्रे येथे त्यांनी राहत्या घराच्या गच्चीवर त्यांच्या लग्नसोहळा पार पाडला. 

'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत  कृतिकाने डेस्टिनेशन वेडिंग करण्याऐवजी नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, "खरं सांगायचं तर, आमच्यासाठी लग्नसोहळा फार महत्वाचा  नव्हता, पण वैवाहिक नातं फार महत्त्वाचं होतं.आम्हाला तीन-चार दिवस चालणारं डेस्टिनेशन वेडिंग नको होतं,या मतावर आम्ही पहिल्यापासून ठाम होतो."

"आमच्या लग्नात खूप मजा आली, कारण आम्ही यजमान म्हणून कुठे धावपळ करत नव्हतो. आता सूर्यास्त होणार आहे, घाई करा.आता नवरीची एन्ट्री झाली पाहिजे.अमुक एक वेळेतच डान्स परफॉर्मन्स झाला पाहिजे,असं सांगणारं तिथे कोणीच नव्हतं. लग्नात कोणताही दिखावा नव्हता.घरातील वडीलधाऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वचजण तिथे उपस्थित होते आणि लग्न आनंदात पार पडलं.अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.

...म्हणून डेस्टिनेशन वेडिंग टाळली

या मुलाखतीत कृतिका म्हणाली,"मुंबई आम्हा दोघांसाठीही एक खास शहर आहे, त्यामुळे आमचं लग्न मुंबईतच व्हावं अशी आम्हा दोघांचीही इच्छा होती. हे तेच शहर आहे जिथे आम्हाला एकमेकांची ओळख झाली. त्यामुळे, डेस्टिनेशन वेडिंग आम्हाला योग्य वाटलं नाही."

कृतिका कामरा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. ती लवकरच बहुप्रतिक्षित 'मटका किंग' या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title : कृतिका कामरा ने डेस्टिनेशन वेडिंग छोड़ घर पर शादी क्यों की?

Web Summary : कृतिका कामरा और गौरव कपूर ने डेस्टिनेशन वेडिंग से बचते हुए मुंबई में अपने घर की छत पर साधारण तरीके से शादी की। अभिनेत्री ने भव्य समारोहों के बजाय अपने वैवाहिक बंधन को महत्व दिया और करीबी परिवार के साथ एक अंतरंग और आनंदमय समारोह को प्राथमिकता दी।

Web Title : Kritika Kamra Chooses Rooftop Wedding Over Destination: Here's Why

Web Summary : Kritika Kamra and Gaurav Kapoor opted for a simple registered wedding on their Mumbai home's rooftop, avoiding a destination wedding. The actress valued their marital bond over extravagant celebrations, prioritizing an intimate and joyful ceremony with close family.