‘ही’ अभिनेत्री आहे सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 14:10 IST2017-01-07T14:10:32+5:302017-01-07T14:10:32+5:30

सुशांतसिंग राजपूत सध्या माध्यमांमध्ये खूप चर्चेत राहतो. बरं अनेकवेळा तर त्याच्या खासगी आयुष्यासाठीच तो अधिक चर्चिला जातो. गेले वर्ष ...

The actress is the daughter of Sushant Singh Rajput | ‘ही’ अभिनेत्री आहे सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी

‘ही’ अभिनेत्री आहे सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी

शांतसिंग राजपूत सध्या माध्यमांमध्ये खूप चर्चेत राहतो. बरं अनेकवेळा तर त्याच्या खासगी आयुष्यासाठीच तो अधिक चर्चिला जातो. गेले वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले राहिले. ‘एम. एस. धोनी’ या बायोपिकच्यानिमित्ताने त्याला एवढ्या वर्षांनंतर पहिला सोला हीट चित्रपट मिळाला. त्यामुळे तो सध्या हवेत आहे.

आता तर अशी चर्चा आहे की, यशाची चव चाखल्यानंतर तो जरा जास्तच बोल्ड झाला आहे. आतापर्यंत प्रेम जीवनाबद्दल कायम ‘खामोश’ राहणाऱ्या सुशांतने एका कार्यक्रमात प्रेमात पडल्याचे मान्य केले. आता ‘ती’ कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना?

‘ती’ दुसरी-तिसरी कोणी नसून ‘राबता’ चित्रपटातील सहकलाकार क्रिती सेनन आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितनुसार, मनिश मल्होत्राच्या पार्टीमध्ये एका मित्राशी बोलत असताना तो म्हणाला की, ‘क्रितीवर माझे प्रेम जडले आहे. आयुष्यात सर्वात जास्त जर मी कोणावर प्रेम करीत असेल तर ते केवळ तिच्यावर करतो.’

त्याच्या अशा खुल्या कबुलीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. दीर्घकाळापासून त्याची गर्लफ्रेंड राहिलेल्या अंकिता लोखंडेपासून वेगळे झाल्यानंतर त्याने प्रथमच एखाद्या मुलीसोबत प्रेम असल्याचे कबुल केले. ‘राबता’ चित्रपटाच्या शूटींग दरम्यान दोघांमध्ये सलगी वाढल्याच्या बातम्या होत्या. तिच्यामुळेच त्यांचे ब्रेक-अप झाले असेसुद्धा सांगण्यात आले; परंतु आम्ही केवळ चांगले मित्र असल्याचे ते सांगत होते. आता सुशांतने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे यंदा न्यू इयरसुद्धा दोघांनी एकत्र साजरा केला.

करिअरबाबत बोलायचे तर तो ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटात अंतराळवीराची भूमिका करताना दिसणार आहे. नुकतेच त्याने यशराज बॅनरवर टीका करत म्हटले होते की, मला ‘बेफिक्रे’ सिनेमाचा प्रस्ताव देण्यात आला नव्हता. आणि दिला असता तरी मी तो स्वीकारला नसता. अशा प्रकारचे सिनेमे मी कधीच करणार नाही.’

Web Title: The actress is the daughter of Sushant Singh Rajput