"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:54 IST2025-06-19T09:54:09+5:302025-06-19T09:54:44+5:30

अभिषेक बच्चनने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिषेक बच्चनने या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? ज्यामुळे त्या पोस्टची इतकी चर्चा होतेय.

abhishek bachchan post goes viral saying i give everything to my family | "जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?

"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आला आहे. पण, यासाठी त्याचा कुठला सिनेमा वगैरे कारण नाही. तर अभिनेत्याची एक पोस्ट चर्चेचा कारण ठरली आहे. अभिषेक बच्चनने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिषेक बच्चनने या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? ज्यामुळे त्या पोस्टची इतकी चर्चा होतेय. जाणून घेऊया. 

अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय की "मला एकदा हरवायचं आहे, या गर्दीत पुन्हा स्वत:ला शोधायचं आहे. जे काही होतं सगळं घरच्यांना दिलं...आता मला स्वत:साठी फक्त काही वेळ द्यायचा आहे". "कधी कधी स्वत:ला भेटण्यासाठी सगळ्यांपासून 'missing' व्हावं लागतं", असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.


दरम्यान, अभिषेक बच्चन हाऊसफुल ५ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचा हा सिनेमा ६ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा चांगली कामगिरी करत आहे. या सिनेमात अभिषेक बच्चनसह रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, अक्षय कुमार, संजय दत्त, जॅकलिन फर्नांडिस, सौंदर्या शर्मा, सोनम बाजवा, नाना पाटेकर, नर्गिस फाकरी हे कलाकार आहेत. 

Web Title: abhishek bachchan post goes viral saying i give everything to my family