आमिर खानची मुलगी इराची या कारणामुळे होतेय सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 12:07 IST2019-03-27T12:05:14+5:302019-03-27T12:07:29+5:30

आमिर खानची मुलगी इरा ही नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर असते. पण ती इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकतेच इन्स्टाग्राम या तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर काही फोटो पोस्ट केले असून या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Aamir Khan's daughter Ira Khan's Instagram photos with a guy spark dating rumours | आमिर खानची मुलगी इराची या कारणामुळे होतेय सोशल मीडियावर चर्चा

आमिर खानची मुलगी इराची या कारणामुळे होतेय सोशल मीडियावर चर्चा

ठळक मुद्देइरा काही दिवसांपासून एका मुलासोबत इन्स्टाग्रामवर सतत फोटो पोस्ट करत आहे. या फोटोंमध्ये ती त्या मुलाला किस करताना आणि अलिंगन देताना दिसत आहे.

बॉलिवूडमध्ये स्टार्सची प्रेमप्रकरणं, त्यांचे ब्रेकअप यांची जितकी चर्चा होते, तितकीच स्टार किडच्या अफेअरची देखील चर्चा असते. स्टार किड काय करतात, कुठे जातात याची उत्सुकता लोकांना लागलेली असते. तैमुर हा स्टार किड तर अतिशय छोटा असला तरी त्याला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांसारखे अनेक स्टार किड सोशल मीडियावर चांगेलच अ‍ॅक्टिव्ह असतात. या स्टार किडमध्ये सध्या आणखी एका अभिनेत्याच्या मुलीची भर पडली आहे. 

 

आमिर खानची मुलगी इरा ही नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर असते. पण ती इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकतेच इन्स्टाग्राम या तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर काही फोटो पोस्ट केले असून या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. इरा काही दिवसांपासून एका मुलासोबत इन्स्टाग्रामवर सतत फोटो पोस्ट करत आहे.

या फोटोंमध्ये ती त्या मुलाला किस करताना आणि अलिंगन देताना दिसत आहे. इराने हे फोटो कॅलिफोर्नियातील सँता बार्बरा येथे काढलेले असून या फोटोत तिच्यासोबत असलेला मुलगा कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. तिने या फोटोंत मिशाल किरपालानीला टॅग केले आहे.

या फोटोतील हा मिस्ट्री मॅन हा मिशाल असून तो इराचा बॉयफ्रेंड आहे का असे नेटिझन्स इराला कमेंटच्या माध्यमातून विचारत आहेत.

तसेच मिशाल तू खूप भाग्यवान आहेस... इराला कधीही दुखवू नकोस. तिच्या वडिलांसोबत मी तिला जेव्हा पहिल्यांदा लहानपणी पाहिले होते, तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो असे एकाने लिहिले आहे. 

मिशाल हा आर्टिस्ट, निर्माता आणि कम्पोझर असून त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊटंवर गाण्यांचे काही व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. त्यातून त्याला संगीताची किती चांगली जाण आहे याची कल्पना येत आहे. 

इरा ही सध्या शिकत असून तिला फिल्म मेकिंगमध्ये रस असल्याचे तिचे वडील आमिर खाननेच एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते.

 

Web Title: Aamir Khan's daughter Ira Khan's Instagram photos with a guy spark dating rumours