आलिया भटचं वेळापत्रक ऐकून सद्गगुरू झाले थक्क, तिला म्हणाले "मग तू जगणार कधी?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:37 IST2026-04-14T13:36:40+5:302026-04-14T13:37:49+5:30

कसं आहे आलिया भटचं वेळापत्रक?

Alia Bhatt And Sadhguru Talk About Sleep Schedule | आलिया भटचं वेळापत्रक ऐकून सद्गगुरू झाले थक्क, तिला म्हणाले "मग तू जगणार कधी?"

आलिया भटचं वेळापत्रक ऐकून सद्गगुरू झाले थक्क, तिला म्हणाले "मग तू जगणार कधी?"

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट आणि सदगुरू यांच्यातील एक विशेष मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सद्गुरूंच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या या मुलाखतीत आलियाने त्यांच्या झोपेच्या वेळापत्रकाबद्दल प्रश्न विचारला असता, सद्गुरूंनी दिलेले उत्तर ऐकून आलिया पूर्णपणे चकीत झाली. यावेळी सद्गुरूंनी आलियाला एक खास सल्लाही दिला.

आलियाने सद्गुरूंना विचारले की, "तुम्ही दिवसाला किती तास झोपता?" त्यावर सद्गुरूंनी उत्तर दिले, "गेली २७-२८ वर्षे मी दिवसाला फक्त अडीच ते तीन तास झोपायचो. पण गेल्या दोन वर्षांत माझ्या डोक्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आणि औषधांमुळे आता मी चार ते साडेचार तास झोप घेतो". हे ऐकून थक्क झालेल्या आलियाने विचारले, "बस इतकेच तास?". तेव्हा सद्गुरूंनी तिला प्रतिप्रश्न केला की, "मग तू किती तास झोपतेस?".

आलियाने जेव्हा सांगितले की ती दररोज ८ ते ९ तास झोपते, तेव्हा सद्गुरूंनी तिला मिश्किलपणे विचारले, "मग तू जगणार कधी?" आलियाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, "असंच शिकवलं गेलंय की झोपल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि मला झोपायला खूप आवडतं". सद्गुरूंनी यावर एक वेगळाच दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले, "कोणालाही झोपायला आवडत नाही, कारण झोपेत आपलं अस्तित्व नसतं. तुम्हाला तुमचं अस्तित्व आवडत नाही का? तुम्ही तुमच्या शरीराला इतका त्रास का देता की त्याला इतक्या विश्रांतीची गरज भासावी?". यावेळी सद्गुरूंनी आलियाला एक खास गुरुमंत्रही दिला. ते म्हणाले, "जर मी तुला अशी गोष्ट शिकवली की ज्यामुळे केवळ १५ मिनिटं शांत बसल्याने तुला ३-४ तास झोपल्यासारखा आराम मिळेल, तर तुला ते शिकायला आवडेल का?" यावर आलियानेही उत्साहाने होकार दिला.

Web Title : आलिया भट्ट की नींद की आदतों से सदगुरु हैरान, पूछा 'तुम जीती कब हो?'

Web Summary : आलिया भट्ट की नींद की आदतों ने सदगुरु को इंटरव्यू के दौरान चौंका दिया। उन्होंने इतनी ज़्यादा आराम की ज़रूरत पर सवाल उठाया और ध्यान के ज़रिए कायाकल्प करने की तकनीक बताई, जिससे सिर्फ़ पंद्रह मिनट में घंटों की नींद के बराबर आराम मिल सकता है।

Web Title : Sadhguru stunned by Alia Bhatt's sleep schedule, asks 'When do you live?'

Web Summary : Alia Bhatt's sleep habits surprised Sadhguru during an interview. He questioned her need for so much rest and offered a technique for rejuvenation through meditation, providing relaxation equivalent to hours of sleep in just fifteen minutes.