"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

By देवेंद्र जाधव | Updated: May 31, 2025 10:03 IST2025-05-31T10:00:09+5:302025-05-31T10:03:22+5:30

सुदेश म्हशिलकरांनी फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं अशी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीविरोधात प्राचीने नाराजी व्यक्त केली

actress Prachi Pisat slam actor Sudesh Mhashilkar written complaint about facebook hacked | "हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

प्राची पिसाटचं प्रकरण सध्या मराठी मनोरंजन विश्वात चांगलंच चर्चेत आहे. अभिनेते सुदेश म्हशिलकर यांनी प्राचीला फेसबुकवर मला तुझ्याशी फ्लर्ट करायचंय असा मेसेज केल्यावर प्राचीने त्याविरोधात आवाज उठवला. मराठी मनोरंजन विश्वातील अनेकांनी प्राचीला या प्रकरणात सपोर्ट केला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सुदेश म्हशिलकर यांनी त्याची बाजू मांडणारी लांबलचक पोस्ट शेअर केली होती. याशिवाय त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात अकाउंट हॅक झाल्याची लेखी तक्रार केली होती. त्यावर प्राचीने टीका केली आहे.

प्राचीने सुदेश म्हशिलकरांवर पुन्हा टीका

प्राची पिसाटने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सुदेश म्हशिलकर यांंनी जी लेखी तक्रार केली आहे त्याविरोधात पोस्ट लिहिली आहे. प्राची लिहिते की, "आणि हे असं अर्धवट, ब्लर,  वाचता न येणारा, टॉपिक सोडून वेगळाच दिशाभूल करणारा ऑफिशिअल म्हणायचं का? मुलींची बदनामी करायला... हॅकरने या वेळेस फक्त इन्स्टाग्रामचे कमेंट्स डीलिट केले असतील. फेसबुकचे नाही केले वाटतं.. खरंतर काहीही लिहिलंय.. प्रयत्न चांगला होता... पुढच्यावेळी स्क्रीनप्लेवर काम करा..." अशा शब्दात प्राचीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

प्राची पिसाटला काय मेसेज आले होते?

२५ मे रोजी प्राचीने सोशल मीडियावर सुदेश यांचे मेसेज शेअर केले होते. यात सुदेश म्हशिलकर यांनी अभिनेत्रीला "तुझा नंबर पाठव...तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये...कसली गोड दिसतेस", असा मेसेज केला होता. तर दुसऱ्या मेसेजमध्ये "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह", असं सुदेश यांनी म्हटलं होतं. प्राचीने याविरोधात आवाज उठवत सुदेश म्हशिलकर यांच्यावर टीका केली. 


सुदेश म्हशिलकर काय म्हणाले

सुदेश म्हशिलकर यांनी लेखी तक्रारीचा फोटो पोस्ट करुन काही दिवसांपूर्वी त्यांची बाजू मांडली होती. सुदेश म्हणाले, “हा मेसेज खरंच मीच केला का?” तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? — याचा मला पत्ता नाही.
त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे — त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

Web Title: actress Prachi Pisat slam actor Sudesh Mhashilkar written complaint about facebook hacked