युवराज व हेजलचा विवाहसोहळा ३० नोव्हेंबरला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 11:18 IST
युवराज सिंग आणि हेजल कीच यांचा साखरपुडा कधीचाच झाला. आता हे जोडप लग्नगाठीत केव्हा अडकणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना या लग्नाची तारीख समोर आली आहे.
युवराज व हेजलचा विवाहसोहळा ३० नोव्हेंबरला?
युवराज सिंग आणि हेजल कीच यांचा साखरपुडा कधीचाच झाला. आता हे जोडप लग्नगाठीत केव्हा अडकणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना या लग्नाची तारीख समोर आली आहे. आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज व हेजल येत्या ३० नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. हा विवाह समारंभ अगदी खासगी असेल. अतिशय जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडले. यानंतर डिसेंबरमध्ये ग्रँड रिसेप्शन दिले जाईल. ५ ते ७ या तारखेदरम्यान रिसेप्शन आयोजित केले जाईल. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये युवराज व हेजल यांचा साखरपुडा झाला होता. तत्पूर्वी तीन वर्षांपासून हेजल व युवी परस्परांना ओळखत होते. मात्र साखरपुड्याच्या तीन महिन्यांआधीपासून दोघेही डेटींगवर होते.