शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

​तरुणाई ते सेलिब्रेटी ...टॅटूची क्रेझ कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 20:15 IST

भारतात प्राचीन काळात बऱ्याच कला अस्तित्वात होत्या. त्यातील काही कला लोप पावल्या तर काही कलांनी आधुनिक रुप धारण केले आहे.....

भारतात प्राचीन काळात बऱ्याच कला अस्तित्वात होत्या. त्यातील काही कला लोप पावल्या तर काही कलांनी आधुनिक रुप धारण केले आहे. त्यातीलच एक कला प्रकार म्हणजे गोंदणे होय. या कलाप्रकाराचे फॅशन जगतात टॅटू हे आजचे आधुनिक रुप जगासमोर आले असून तरुण-तरुणींपासून ते सेलिब्रेटीपर्यंत ते आकर्षणाचा विषय बनले आहे.  आकर्षक लूकसाठी टॅटूचा वापरआधुनिक लूक आत्मसात करत असलेल्यांसाठी कोणताही रफ अँड टफ लूक देणारा टॅटू शोभून दिसेल. महिलांसाठी एंजल टॅटू, क्रॉस, पोर्र्टेट, स्टार टॅटू, फ्लॉवर टॅटू, प्रियकराचे नाव आदी ट्रेंड लोकप्रिय आहेत. टॅटू दोन प्रकारे काढले जातात, त्यात काही दिवस हौस भागवून घ्यायची असेल तर तात्पुरते टॅटू आणि दीर्घकाळ हवा असल्यास मशिनच्या साहाय्याने टॅटू रेखून घेण्यात येतात. मात्र यासाठी खूप सहनशक्ती हवी. हॉलिवूडकरांना विशेष प्रेम  ही फॅशन आता चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्री आणि रॅम्प वॉक करणाºया मॉडेल्सपासून सगळ्यांना टॅटू कलेने आपलेसे केले आहे.  सेलिब्रिटी आपल्या शरीरावर आवर्जून टॅटू गोंदूण घेतात. आपले व्यक्तिमत्त्व वेगळे दिसावे आणि तरुणाईच्या मनात आकर्षणता निर्माण व्हावी हा त्यामागील हेतू असतो. विशेषत: हॉलिवूड चित्रपटात टॅटू काढून घेण्याची क्रेझ जास्त आहे. त्याचेच अनुकरण करीत बॉलिवूडमध्येही बºयाच चित्रपटांमध्ये नायकांनी टॅटू काढलेले आपणास पाहावयास मिळतात. नुकताच प्रदर्शित झालेला हाऊसफुल-3 मध्ये अभिषेक बच्चनच्या मानेवर टॅटू काढलेला आहे. या टॅटूमुळे अभिषेकचा लूक काही औरच दिसतो.प्रत्येक इंचाला १५०० रुपये खर्चतरुणाई टॅटूच्या प्रेमात आहे. त्या पे्रमापोटी अंगावर टॅटू मिरवण्यासाठी हजारो रुपये खर्च करायलाही तयार आहे. हाय प्रोफाईल तरुणांमध्ये टॅटूचे जास्त वेड असले तरी मध्यमवर्गीय महाविद्यालयीन तरुणांमध्येही टॅटूचे फॅड दिसू लागले आहे. कायमस्वरूपी टॅटू काढण्यासाठी प्रत्येक इंचाला १५०० रुपये खर्च येतो. विविध प्रकारचे कायमस्वरूपी टॅटू अंगावर गोंदवून घेताना प्रचंड वेदना तर होतेच, परंतु कित्येक तासही खर्ची होतात.  टॅटूची नाविण्यतादिवसेंदिवस टॅटूचे आधुनिकीकरण होत आहे. त्यात राशीचे चिन्ह, ड्रॅगन, गुलाब, स्वत:च नाव असे टॅटू असे पर्याय आले आहेत. टॅटूसाठी विशेष रंग वापरले जातात. लहान मोठयांपासून सर्वांना आकर्षित करणाºया टॅटूबरोबर आरोग्याची सुरक्षितता आणि त्यामागील धोक्याचे आकलन हे महत्त्वाचे आहे. पेंटिंग टॅटूमध्ये एअरब्रशच्या साहाय्याने रंग भरून रेखला जातो. यासाठी सुरुवातीला नक्षीचे स्टिकर त्वचेवर चिकटवतात. एकदा हे स्टिकर चिकटवले की एअरब्रशच्या साहाय्याने रंग भरले जातात. स्टिकर टॅटू हा प्रकार मुलांमध्ये जास्त प्रिय आहे. पण एखादे चांगले डिझाईन असेल तर महिलासुद्धा स्टिकर टॅटू चिटकवू शकतात. शरीराच्या ज्या भागावर टॅटू हवा असेल तिथे थोडा वेळ हे स्टिकर चिकटवून ठेवावं. त्यावर थोडं पाणी शिंपडावं. झाला स्टिकर टॅटू तयार. महिलांनाही टॅटूची भुरळमेहंदी टॅटू ही तर खास महिलांची फॅशन. सध्या मानेवर, मनगटावर, दंडावर अगदी पोटावरही मेहंदी टॅटू बनवून घेता येतो. धार्मिक टॅटू हा प्रकारही सध्या ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये आवडत्या देवतेचं चित्र, मंत्र अथवा सुचिन्ह टॅटूस्वरूपात रेखले जातात. मुलींना खास करून सॉफ्ट म्हणजे फुलपाखरू, एखादे फूल अशा प्रकारचा टॅटू काढून घ्यायला आवडतं तर मुलांची आवड थोडी वेगळी असते. म्हणजे ड्रॅगनसारखे टॅटू आवडतात. काही जणांना आध्यात्मिक टॅटू म्हणजे ओम किंवा एखाद्या देवाची प्रतिकृती काढून घ्यायला आवडते.