शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मोबाइलच चार्ज करताना चुकता म्हणून तुमचा मोबाइल बिघडतो!

By admin | Updated: June 16, 2017 13:47 IST

मोबाइल चार्ज नसेल तर अनेकजण हायपर होतात आणि नको ते करत बसतात..

- नितांत महाजनमोबाइल चार्ज नसेल आणि तो बंद पडला की आपणच किती हायपर होतो ते आठवून पहा. प्रचंड त्रास होतो. आपण बेचैन होतो. कुठं कुठं चार्जर शोधतो, मागतो, उसना आणतो. कुठं प्लग दिसला की लावतो तिथं चार्र्जिंगला. काहीजण तर रेल्वे स्टेशन, मॉल, हॉटेल्स इथंही फोन चार्जिंगला लावून बोलत असलेले दिसतात. पण कधी विचार केलाय का? आपल्या फोनचं मॅन्युअल कधी वाचलंय का कधी आणि कसा फोन चार्ज करावा? काय करावं? काय टाळावं? फोनची बॅटरी आणि त्याचा परफॉर्मन्स यांचं काही नातं असतं की नाही? पण हे सगळं माहितीच नसल्यानं काही चूका आपण करतोच. आणि मग त्या सतत करत राहिल्यानं आपले फोन सतत बिघडतात. आणि दुरुस्त तरी करावे लागतात नाहीतर नवीन तरी घ्यावे लागतात. फोनच्या बिघडण्याचं कारण अनेकदा या चुकीच्या चार्जिंगमध्ये आढळतं. त्यामुळे त्या चूका कोणत्या हे समजून घेवून त्या टाळणं उत्तम. तरच तुमच्या मोबाईलचं लाइफ वाढेल!१) बॅटरी पार उतरण्याची वाट पाहत बसता तुम्ही? १ टक्का उरली , फोन टुंगटुंग वाजत असला तरी फोनवर बोलणं सुुरुच. फोन पूर्ण बंद करेपर्यंत चार्जिंगलाच लावत नाही? मग तुमचा फोन लवकर बिघडणारच. शक्यतो बॅटरी १५% असतानाच फोन चार्जिंगला लावावा पूर्ण बंद पडण्याची वाट पाहू नये. फोन बंद पडला की चार्ज करणं ही महामोठी चूक.

२) शंभर टक्के बॅटरी चार्ज करता तुम्ही? कशाला? त्याची काही गरज नसते. फोन चार्जिंगला लावून अजिबात झोपू नये. बॅटरी शंभर टक्के चार्ज करू नये. त्यानं बॅटरीवरचा ताण वाढतो. त्यामुळे फक्त ८५ % इतकीच बॅटरी चार्ज करावी.

३) चार्जिंगला लावलेला फोन तसाच ठेवून तुम्ही फोनवर बोलता? हे तर अत्यंत चूक. फोन चार्जिंगला असताना कानाला फोन लावू नये. त्याचं रेडिएशन जास्त असतं. त्यानं फोन चार्र्जिंगवर तर ताण येतोच, पण आपल्या आरोग्यासाठीही ते त्रासदायक असतं.

४) कुठंही जा, दिसला प्लग की फोन चार्जिंगला लावणं सोडा. एकतर त्याची गरज नसते. बॅटरी १५ टक्केपर्यंत खाली येईपर्यंत फोन चार्ज करूच नये. दुसरं सगळ्याकडच्या चांगल्या वाईट प्लग मध्ये कुणाचाही कुठलाही चार्जर घेवून बॅटरी चार्ज करू नये.त्यानंं फोनचे चार्जिंग सॉकेट खराब होतात.

५) ओव्हरर्चार्जिंंग टाळायलाच हवं. काहीजण सतत फोन चार्ज करतात. त्यामुळे तो ओव्हरचार्ज होत राहतो, त्यानं फोनच्या प्रोसेसिंग सिस्टिमवर ताण येतो.