शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

तुमची पर्स फॅशनेबल आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 18:30 IST

पर्स, बॅग, हँडबॅग, झोळी, क्लच, पिशवी असे एक ना अनेक प्रकार आज उपलब्ध आहे. पण हा प्रत्येक प्रकार वापरण्याची विशिष्ट वेळ असते. विशिष्ट उद्देशानं जर यातलं काही वापरलं तर मग ते एकदम शोभून दिसतं.

- मोहिनी घारपुरे देशमुखकुठे जायचं आहे? काय प्रसंग आहे? हे पाहून आपण कपड्यांची फॅशन करतो.पण सतत सोबत असलेल्या पर्सचं काय?आपण केलेल्या फॅशनला आपल्या हातातली पर्सही शोभायला हवी ना!पर्स, बॅग, हँडबॅग, झोळी, क्लच, पिशवी असे एक ना अनेक प्रकार आज उपलब्ध आहे. पण हा प्रत्येक प्रकार वापरण्याची विशिष्ट वेळ असते. विशिष्ट उद्देशानं जर यातलं काही वापरलं तर मग ते एकदम शोभून दिसतं. त्याची फॅशनच होते म्हणाना. करू ती फॅशन असा फंडा अनेकींचा असतो. पण असं असलं तरीही बेसिक फॅशन सेन्स उधळून लावला तर व्हायची ती गोची होणारच . म्हणूनच आपल्या लुकला कॅरी करेल असाच प्रकार निवडायला हवा. फॅशनेबल रहायचं तर ती शोभून दिसण्याची काळजीही घ्यायलाच हवी ना! पर्सेसच्याबाबतीतही असंच आहे.क्लचेस - पार्टीवेअर आऊटफीट सोबत हे क्लचेस एकदम सुंदर दिसतात. हातात सहज कॅरी करता येऊ शकणाऱ्या क्लचेसची हल्ली खूपच चलती आहे. वर्कवाले क्लचेस पार्टीमध्ये तर जरा साधे, स्टायलिश क्लचेस कॅज्युअल मीटींग्ससाठी वापरता येतील. त्यातही अलिकडे मॅगझिन, न्यूजपेपर प्रिंट्सच्या क्लचेसची चलती आहे. तर पार्टीसाठी स्टोन्सवाले किंवा जरा ट्रेडीशनल आणि एथनिक लुकचे क्लचेस पसंत केले जातात.बटवे - बटवे हे फक्त आजीबार्इंनाच शोभून दिसतात हा विचार फॅशन जगतात केव्हाच मागे पडला आहे. आपल्या पारंपरिक सणांच्या वेळी लहान मुली, बायका, तरूणीही खणाचे बटवे, पर्सेस कॅरी करताना दिसतात. हे बटवे दिसायलाअतिशय सुंदर दिसतात. विशेषत: पारंपरिक पोशाखाबरोबर बटवा कॅरी केल्यानं एक मस्त लूक येतो. पर्सेस - कधीही कुठेही बाहेर पडायचं म्हणजे पर्स तर हवीच. पण त्यातही जरासा एथनिक सेन्स वापरला पाहिजे. फक्त एकच पर्स वापरणारी बाई अलिकडच्या काळात शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे किमान दोन आणि कमाल कितीही पर्सेस जवळ असल्या तरीही रोज आपल्या कपड्यांना आणि प्रसंगांना सूट होईल अशीच पर्स निवडणं अधिक शोभनीय ठरतं. रोज एकच पर्स कॅरी करणाऱ्याही अनेकजणी असतील पण स्वत:साठी थोडासा वेळ काढून ड्रेसला सूट होईल अशी आपल्या कलेक्शनमधली खास पर्स निवडावी. सॅक - दुचाकीवरून फारवेळ फिरस्ती करणाऱ्या महिला आणि पुरूषांसाठीही आपलं सामान कॅरी करण्यासाठी सॅक हा एक अत्युत्तम पर्याय आहे. वापरायला रफ अँड टफ अशी सॅक पाठीवर अडकवली तर पंजाबी ड्रेस शक्यतो नकोच, त्याऐवजी जीन्स आणि स्मार्ट कुर्तीच अधिक खुलून दिसते. झोला (झोळी) - काही वर्षांपूर्वी केवळ पत्रकारांच्याच खांद्यावर लटकणारी झोळी केव्हा फॅशन जगतात नवा लुक घेऊन आली आणि तरूणींच्या खांद्यावर लटकू लागली याचा पत्ताही लागला नाही. ही झोला पर्स विशेषत: धोती स्टाईल सलवार किंवा हॅरम पँट आणि कुर्तीसोबत खूपच छान दिसते.