शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

या घरगुती वस्तू खुलवतील तुमचे सौंदर्य

By admin | Updated: July 13, 2017 02:16 IST

पुडिंग किंवा सॉससारखे पदार्थ घट्ट करण्यासाठी स्वयंपाकघरात आरारूट पावडरचा वापर केला जातो

आरारूट पावडर - पुडिंग किंवा सॉससारखे पदार्थ घट्ट करण्यासाठी स्वयंपाकघरात आरारूट पावडरचा वापर केला जातो. मात्र, ही हलकी पांढऱ्या रंगाच्या पावडरमध्ये जखमा बऱ्या करण्याच्या गुणधर्म आहे. त्याशिवाय खरबरीत त्वचा व त्वचेवरच्या डागांवरच्या उपचारांसाठीही हे अत्यंत उपयुक्त आहे. आरारूट पावडर कोको पावडरसह मेकअप फाउंडेशन म्हणून वापरतात. तसेच कोरडा शॅम्पू म्हणूनही आरारूट पावडर वापरता येईल.टोमॅटो - टोमॅटोचा अर्क नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करतो. त्यामुळे त्वचेच्या खुल्या रंध्रांचा आकार कमी होतो आणि तुम्हाला तरुण, तजेलदार, चमकदार त्वचा मिळते. एक-दोन चमचे टोमॅटो रस घ्या. तो तुमच्या चेहऱ्यावर कापसाच्या बोळ्याने लावा. हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा. 15 मिनिटांसाठी ते तसेच सोडून द्या. नियमितपणे हा प्रकार केल्यास रंध्रांचा आकार कमी होईल. सिबम सिक्रेशनचे संतुलन राखले जाईल. टोमॅटोत असलेल्या सी जीवनसत्त्वामुळे आरोग्यदायी चमकदार त्वचा मिळते.सफरचंद - सफरचंद त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या जीवनसत्त्व सी, ए ने समृद्ध आहे. सफरचंदात नैसर्गिक अँटी-एजिंग सोल्यूशन आहेत. एक टीस्पून किसलेले सफरचंद घ्या. त्यात अर्धा चमचा नारळाचे तेल मिसळा आणि दोन ते तीन थेंब लेमन इसेंशियल आॅइल मिसळा. हे सर्व मिसळून त्याची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा. अर्ध्या तासाने हे धुऊन टाका. तुमची त्वचा कोरडी असल्यास लेमन इसेंशियल आॅइलऐवजी कॅस्टर कॅरियर आॅइलचा वापर करा. स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरी अँटीआॅक्सिडंट्सनी म्हणून समृद्ध आहे. बंधक गुण आणि सूज कमी करण्याच्या गुणधर्मामुळे त्वचेच्या जीर्णतेची प्रक्रिया धिमी होते. त्याशिवाय सूर्यप्रकाशाने होणारी त्वचेची हानी बरी करते. अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. त्याशिवाय त्वचेतील मृत पेशी काढते, पुरळ नियंत्रणात आणते. पिगमेंटेशनवर नियंत्रण ठेवते, तसेच त्वचेवरील डागही नियंत्रित करते. एक टीस्पून स्ट्रॉबेरी, अर्धा टीस्पून कोको पावडर आणि एक ते दोन थेंब लॅव्हेंडर इसेंशियल आॅइलचे मिश्रण तुमची त्वचा डागरहित नितळ करू शकते. मधाच्या पोळ्याचं मेण : बीसवॅक्स हे प्रभावी आणि नैसर्गिक थिकनिंग एजंट आहे. त्याचा घट्टपणा आणि त्यातील मृदुपणा हा प्रामुख्याने लोशन्स आणि मलमांमध्ये दिसतो. त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक रूपामध्ये जतन करणे शक्य होते. कोरडी, खरबरीत त्वचा यांच्या उपचारांसाठी हे उपयुक्त ठरते.