आपल्या लाडक्या क्रिकेटरांचे अलिशान घर पाहून व्हाल थक्क !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 18:39 IST
सेलिब्रिटी म्हटले म्हणजे त्यांच्या लाइफस्टाईलचे आकर्षण सर्वांनाच असते. त्यांचे वागणे, बोलणे, चालणे, राहणीमान आदी त्यांच्या या गोष्टींबाबत जाणून घेण्याचा मोह आवरता येत नाही.
आपल्या लाडक्या क्रिकेटरांचे अलिशान घर पाहून व्हाल थक्क !
-Ravindra Moreसेलिब्रिटी म्हटले म्हणजे त्यांच्या लाइफस्टाईलचे आकर्षण सर्वांनाच असते. त्यांचे वागणे, बोलणे, चालणे, राहणीमान आदी त्यांच्या या गोष्टींबाबत जाणून घेण्याचा मोह आवरता येत नाही. आज आम्ही आपणास आपल्या लाडक्या क्रिकेटर्सच्या घरांविषयी माहिती देत असून ती माहिती जाणून घेतल्यास आपण नक्की थक्क व्हाल. * मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अलिशान घर सचिन तेंडुलकर मुंबईमध्ये आपल्या परिवारासोबत याच अलिशान घरामध्ये राहतो. त्यांच्या घरात स्विमिंग पूल आणि जिम सोबतच सुख-सुविधांच्या सर्व वस्तू आहेत. घराच्या ग्राऊंड प्लोअरमध्ये सचिनला मिळालेल्या अॅवॉर्ड्साठीदेखील विशेष जागा आहे. * कलकत्त्यातील सौरभ गांगुलीचे अलिशान घरकलकत्त्यामध्ये महाराजाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या याच घरात सौरभ गांगुली आपल्या परिवारासोबत राहतो. गांगुलीच्या या घरात सुमारे ४८ खोल्या आहेत. गांगुलीच्या या घरात इंटीरियरचे पूर्ण काम बंगाली संस्कृति आणि कलात्मकतेने परिपूर्ण आहे. * रांचीमध्ये धोनीचे घरदेखील कमी नाहीरांचीमध्ये हरमू रोड स्थित याच अलिशान घरात महेंद्र सिंह धोनी अगोदर राहत होता. मात्र सध्या आयपील १० दरम्यान त्याचा परिवार कांके रोड स्थित एका फॉर्म हाऊसमध्ये शिफ्ट झाला आहे. * खूप आकर्षक आहे ‘पार्टी लव्हर’ गेलचे घरवेस्ट इंडीजचे फलंदाज क्रिस गेलने आपल्या घरात पार्टीसाठी विशेष जागा बनविली आहे. जमैकामध्ये स्थित या तीन मजली घरात पूल पार्टीसाठी स्विमिंग पूल तर आहे शिवाय घरात एक डान्स प्लोअरपण आहे. * खास मुलांसाठी वॉर्नरने बनविले घरडेविड वॉर्नर आपल्या पत्नीसोबत अगोदर एक टू बेडरुम फ्लॅटमध्ये राहत होता. त्याची पहिली मुलगी इवीच्या जन्मानंतर त्यांनी सिडनीमध्ये हे अलिशान घर खरेदी के ले. * पत्रकार पत्नीसोबत या अलिशान घरात राहतो शेन वॉटसनआॅस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये शेन वॉटसन आपल्या स्पोर्ट पत्रकार पत्नीसोबत याच घरात राहतो. चार बेडरुम असलेल्या या घराचे वैशिष्टे म्हणजे याचा आकार ‘सी’ सारखा आहे. * टूरिस्ट प्लेस आहे लाराचे हे घरत्रिनिडाडमध्ये ब्रायन लाराचे हे घर लोकांसाठी एखाद्या टूरिस्ट प्लेससारखे आहे. लाराच्या या अलिशान घरामध्ये एक बॅटच्या आकाराचा स्विमिंग पूल आहे. याशिवाय लारा जवळ टोबॅगो आणि जमैकामध्येही अलिशान घर आहे. Also Read : Must See : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अलिशान घराचे Inner side फोटो !