Yeh Dil Maange MoreEPIC! Please take me back in time!Advertiser: Pepsi
Posted by Best Ads on Friday, 1 April 2016
Yeh Dil Maange More...टीम इंडियाची जूनी जाहिरात व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 19:36 IST
भारतीय संघासोबत काही वर्षांपूर्वी चित्रित करण्यात आलेली पेप्सीची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Yeh Dil Maange More...टीम इंडियाची जूनी जाहिरात व्हायरल...
भारतातील क्रिकेट चाहत्यांचे क्रिकेट वेड सगळ्यांनाच ठाऊक आहे. नुकत्याच वर्ल्डकप टी-२० सामन्यांदरम्यान त्याचा चांगलाच प्रत्यय आला. या स्पर्धेत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गारद झाली. पण यापश्चातही क्रिकेटप्रेमींचे टीम इंडियावरील प्रेम कमी झाले नाही. सध्या संपूर्ण देश विराटचे गुणगाण गातो आहे. विराटच्या टी-२०मधील कामगिरीने अनेकांना त्याचे फॅन केले आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट सध्या सोशल मीडियामध्ये फिरते आहे. ती म्हणजे, एक जूनी जाहिरात. भारतीय संघासोबत काही वर्षांपूर्वी चित्रित करण्यात आलेली पेप्सीची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या जाहिरातीत हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, युवराज सिंग, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली असे अनेक चेहरे आहेत. ही पेप्सीची जाहिरात तेव्हाही लोकप्रीय झाली होती, आत्ताही होते आहे. तेव्हा बघू या तर....