जगातील सर्वात एकाकी हत्तीणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 19:07 IST
जपानच्या एका प्राणीसंग्राहलयातील 69 वर्षीय हत्तीणीचा मृत्यू झाला आहे.
जगातील सर्वात एकाकी हत्तीणीचा मृत्यू
जपानच्या एका प्राणीसंग्राहलयातील 69 वर्षीय हत्तीणीचा मृत्यू झाला आहे. ‘जगातील सर्वात एकाकी हत्तीण’ म्हणून ती ओळखली जायची.तिच्या मृत्यूमुळे ‘प्राणीसंग्राहलयात प्राण्यांना ठेवावे की नाही’ यावर चर्चा आता अधिक जोर पकडण्याचे चिन्हे दिसताहेत.आशियाई प्रजातीच्या या हत्तीणीचे नाव ‘हनाको’ होते. हनाको जेव्हा केवळ दोन वर्षांची होती तेव्हा थायलंड सरकारने 1949मध्ये जपानच्या टोकियो शहरातील ‘पार्क झू’ या प्राणीसंग्राहलयाला तिला भेट म्हणून दिले होते.तेव्हापासून ते आजतयागत 67 वर्षे सिमेंट-कॉक्रिटच्या कुंपणात ती एकटी राहिली. मागच्या वर्षी एका ब्लॉग पोस्टद्वारे हनाकोची एकाकी अवस्था जगासमोर आली.कॅनडाच्या यूलारा नाकागवाने ब्लॉगमध्ये लिहिले की, हनाको एकटी-एकाकी त्या छोट्याशा उजाड सिंमेटच्या कुंपणात निर्जीवपणे उभी असते. ना कोणत्या सुविधा, ना कसली सोय. एखाद्या मूर्तीप्रमाणे ती आपला दिवस घालवते. जगण्याची प्रेरणा उत्पन्न करणारी कोणतीही गोष्ट तिच्यासमोर नाही.नाकागवाची ब्लॉग पोस्ट व्हायरल झाल्यावर हनाकोला अभयारण्यात सोडून देण्याची विनंती करणाऱ्या मागणीला सुमारे पाच लाख लोकांनी समर्थन दर्शविले. परंतु अवघे आयुष्य पिंजऱ्यामध्ये व्यतीत केले असल्यामुळे जंगलातील वातावरणाशी या वयात तिला जुळूवून घेणे खूप अवघड असल्याची कारण तज्ज्ञ व संग्राहलयाच्या अधिकाऱ्यांनी समोर केले. (हनाकोच्या तरुणपणाचा फोटो)cnxoldfiles/a>की, हनको सोडून गेल्यावर धक्काच बसला. दु:ख, राग, निराशा आणि आनंद अशा सर्व भावना एकाच वेळी उन्मळून आल्या. आनंद यामुळे की, त्या कोंडवाड्यातून तिची सुटका झाली. तिच्यासाठी आपण खूप आधीच काही करू शकलो असतो तर बरं झाले असते.